पुणे विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.61 टक्‍क्‍यांवर 

Corona-patient
Corona-patient

पुणे - पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आजअखेर कोरोनाबाधित 13 हजार 632 रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.76 टक्के इतके आहे. परंतु बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, ते 91.61 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण 22 लाख 81 हजार 554 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यात चार लाख 93 हजार 498 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी चार लाख 52 हजार 74 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 27 हजार 792 आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन लाख 18 हजार 329 झाली आहे. त्यापैकी दोन लाख 95 हजार 357 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 441 आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित 7 हजार 531 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.78 टक्के आहे. 

पुणे विभागातील इतर जिल्ह्यांतील स्थिती (24 ऑक्‍टोबरअखेर) 
सातारा जिल्हा : 

कोरोना बाधित रुग्ण : 44 हजार 655 
बरे झालेले रुग्ण : 38 हजार 661 
उपचार घेत असलेले रुग्ण 4 हजार 514 
मृत्यू : 1 हजार 480 

सोलापूर जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण : 38 हजार 937 
बरे झालेले रुग्ण : 33 हजार 911 
उपचार घेत असलेले रुग्ण : 3 हजार 633 
मृत्यू : 1 हजार 393 

सांगली जिल्हा 
कोरोना बाधित रुग्ण : 46 हजार 869 
बरे झालेले रुग्ण : 40 हजार 17 
उपचार घेत असलेले रुग्ण : 2 हजार 245 
मृत्यू : 1 हजार 607 

कोल्हापूर जिल्हा 
कोरोना बाधित रुग्ण : 47 हजार 708 
बरे झालेले रुग्ण : 44 हजार 128 
उपचार घेत असलेले रुग्ण : 1 हजार 959 
मृत्यू : 1 हजार 621

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com