"भाजपमध्ये मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वच आमच्या जवळचे"

शिवसेनेची गुढी ही महाराष्ट्राबाहेरही फडकवण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही राऊत म्हणाले.
Sanjay Raut
Sanjay Rautसकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर राज्यातील निर्बंध हटवल्याने निर्बंध मुक्ती गुढी साजरी केली जात आहे. गुढी पाडवानिमित्त बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्य निर्बंध मुक्त करणे ही महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला दिलेली मुख्यमंत्र्यांकडून भेट आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेची गुढी ही महाराष्ट्रात फडकत राहीलच पण महाराष्ट्राबाहेरही फडकवण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही राऊत म्हणाले.

गुढी पाडवा हा पवित्र विषय आहे. संस्कार, संस्कृती आणि धर्म या संदर्भातला विषय आहे. त्यामुळे गुढी अशी कुणाची पाडायचे नसते पण आपली गुढी त्यांच्या पेक्षा जास्त उंच करण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत

राऊत पुढे म्हणाले, "गुढी कधीच कडू करायची नसते गुढी नेहमीच गोड असते. विरोधक व्यक्तिगत शत्रू नाही. ते वैचारिक शत्रू असतील. त्यांच्याशी आम्ही त्यापद्धतीने लढू. बदल्याच्या भावनेने लढण्याचा प्रश्नच येत नाही. मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस, अशिष शेलार हे सर्व आमच्या जवळचे आहेत."

Sanjay Raut
कोरोनाचा नवीन व्हेरियंट 'XE' ची संक्रमणक्षमता सर्वाधिक; WHO चा इशारा

भांडणे विचारांनी असायला पाहिजे, व्यक्तिगत शत्रुत्वाने तुम्ही जर भांडण करत असाल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला, आणि परंपरेला धक्का बसेल. यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे पर्यंत, अगदी शरद पवार पर्यंत कोणीही व्यक्तिगत सूडाच्या भावनेने राजकारण केल्याचं मला आठवत नाही. आमच्यावर ते संस्कार आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com