संविधान भाजपची जहागिरी नाही, भाजपकडून महाऱाष्ट्राचा अपमान : राऊत

Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई : शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे नेहमीच भूमिकेवर ठाम राहिलेले आहेत. मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे युती तोडण्याचे पाप उद्धवजी करणार नाहीत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपने आज राज्यपालांची भेट घेतली असली तरी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना सर्व अधिकार दिले आहेत. आमदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली.  

राऊत म्हणाले, की भाजप महाराष्ट्राचा अपमान करत आहे. बहुमत नसेल तर सरळ सांगा, आम्हीही सरकार स्थापन करू शकत नाही. अल्पमतातील सरकार भाजप का आणणार नाही. 2014 मध्ये त्यांनी प्रयोग केला होता. पण, आता आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे. आता कोणत्याही धमक्या चालणार नाहीत. आठ तारखेनंतर हे सरकार अस्तित्वात नसेल. भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही, हे कळत नाही. साम, दाम, दंड भेदाची भाषा आमच्याकडे चालत नाही. जोपर्यंत खुर्ची आहे, तोपर्यंत हे सर्व चालते. सत्तेचा माज उतरली की हे सर्व जाते. महायुतीला जनादेश मिळाला तर सरकार स्थापन करा. धमक्या आणि ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही. शिवसैनिक कधी खंजीर खुपसत नाही.  

राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रय़त्न केला जात आहे. भाजपला हा प्रश्न विचारला पाहिजे, की तुम्ही भूमिकेवर ठाम आहात का? महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या हितासाठी ते जो निर्णय घेतील, त्याला आमदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात जी अस्थिरता निर्माण होत आहे, ती त्यांच्यामुळे होत आहे. या राज्याला सरकार मिळावे, त्याला ताकद देण्याचे काम आमचे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, यावर आम्ही ठाम आहोत. राज्याचे नेतृत्व शिवसेनाच करेल ही जनभावना आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com