शरद पवार आणि ऑस्ट्रेलियाची अधोगती काय आहे संबंध? (व्हिडिओ)

Ricky-Ponting-Sharad-Pawar
Ricky-Ponting-Sharad-Pawar

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास महिना उलटल्यानंतर महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. आणि देशात राजकारणाचा नवा इतिहास लिहला गेला. या सरकार स्थापनेत कॅप्टनची भूमिका बजावली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. 

विधानसभा निवडणुकीची प्रचार धुमाळी सुरू झाल्यानंतर ते सरकार स्थापनेपर्यंत शरद पवार यांचे नाव वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार चर्चेत राहिले. मात्र, आता ते एका वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. 

देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे शरद पवार यांनी भूषवली आहेत. त्याप्रमाणे देशाबाहेरही त्यांचा बोलबाला राहिला आहे. राजकारणा व्यतिरिक्त पवारांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (आयसीसी) चे अध्यक्षपदही भूषवले आहे. 

पवार ज्यावेळी आयसीसीचे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांच्यासोबत एक अपमानास्पद घटना घडली होती. 2006 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला होता. आणि या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचा तत्कालिन आणि कायम वादग्रस्त राहिलेला कर्णधार रिकी पाँटिंग आणि आणखी एका खेळाडूने पवारांशी चुकीचे वर्तन केले होते. त्यानंतर पूर्ण देशभरात पाँटिंग आणि ऑस्ट्रेलिया टीमचे पोस्टर जाळण्यात आले होते. त्यांच्या प्रतिकृतींची धिंडही काढण्यात आली होती. पवार यांच्या पद आणि वयाचा अपमान केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलिया टीमला जगभरातील माध्यमांनी चांगलेच फैलावर घेतले होते. 

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या घडामोडीनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. भाजप समर्थकांनी ऑस्ट्रेलियाचे हे कृत्य बरोबर होते, असे म्हटले आहे. तर भाजप विरोधकांनी यानंतरच ऑस्ट्रेलियाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब दिवस आले, अशी टिप्पणी केली आहे. 2007 चा टी-20 वर्ल्ड कप, 2011 च्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आणि त्यानंतर भारतात सुरू झालेल्या आयपीएलसारख्या क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवरही लिलावात बोली लावली होती. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया संघाचे गर्वहरण केले होते. 

शरद पवार हे सध्याच्या राजनीतीचे सगळ्यात मोठे चाणक्य आहेत, याची कल्पना कदाचित ऑस्ट्रेलिया टीमला नसेल. सध्या जागतिक क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डपेक्षा बीसीसीआय ही मानाची संस्था म्हणून ओळखली जाते. बीसीसीआयला जगातील सर्वांत मोठी क्रिकेट संस्था बनविण्यात पवार यांचे योगदानही त्यांना माहित नाही, असेही काहीजणांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com