संभाजीराजेंना तुळजापुरात अडवलं तो निजामाचा 'देऊल ए कवायत' कायदा काय आहे ?

महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिरात अजूनही निझामाने तयार केलेल्या ‘देऊल ए कवायत’नुसार कारभार चालतो
छत्रपती संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजेsakal

सोमवारी संध्याकाळी छत्रपती संभाजीराजे कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले होते. मात्र दर्शनासाठी हे देवीच्या गाभाऱ्यात जात असताना मंदिर प्रशासनाने नियम दाखवत त्यांचा प्रवेश रोखला. देवुल ए कवायती कायदा कलम ३६ नुसार छत्रपती संभाजीराजेंना देवीच्या गाभाऱ्यात सोडले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्या कायद्याद्वारे छत्रपती संभाजीराजे यांचा प्रवेश रोखला गेला त्या कायद्यासंदर्भात अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा कायदा नेमका काय? याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

स्वतंत्र भारतात लोकशाहीनुसार कारभार चालत असला तरी महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिरात अजूनही निझामाने तयार केलेल्या ‘देऊल ए कवायत’नुसार कारभार चालतो. या कायद्याला शंभर वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे.

छत्रपती संभाजीराजे
'उद्धवा दिलेली स्क्रिप्ट नीट पाठांतर कर'; भाजपनं पवारांसोबत शेअर केलं व्यंगचित्र

तुळजापूरमध्ये १३१७ मध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता गेली त्यानंतर १९४८ पर्यंत म्हणजे सुमारे ६३१ वर्षे तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर मुस्लिमांच्या अधिपत्याखाली राहिले. त्यानंतर यावर कोणीच आपला अधिकार गाजवला नाही. शेवटच्या निझाम राजवटीत १९०९ मध्ये या मंदिराचा ताबा सरकारकडे देण्यात आला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आजही या तुळजाभवानी मंदिरात निझामाने तयार केलेल्या ‘देऊल ए कवायत’ या कायद्यानुसार कारभार चालतो

छत्रपती संभाजीराजे
संभाजी राजे निवडणूक लढणार, नव्या संघटनेची घोषणा

तुळजाभवानी मंदिराचा कारभार बहुतांश काळ स्थानिक पुजारीच पाहात होते. मंदिरातील हक्कावरून दोन गटांत वाद निर्माण होत असल्याने निझामाचे तत्कालीन जहागीरदार रावरंभा निंबाळकर यांनी हे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पुजाऱ्यांमधील मतभेद मिटावेत, कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, यासाठी निझाम सरकारने २ मार्च १९०९ रोजी मंदिर ताब्यात घेऊन त्यासाठी देऊल ए कवायत कायदा तयार केला.

छत्रपती संभाजीराजे
पाच हजार यशस्वी प्रसूती करणाऱ्या नर्सचा असा झाला दुर्दैवी अंत

देऊल ए कवायत कायदा

मंदिराच्या पारंपरिक विधींची जपणूक करावी, मंदिरासंदर्भात कोणतेही वाद न मिटल्यास न्यायालयात दाद मागावी, पुजाऱ्यांचे हक्क कायम राहावेत, अशा अनेक नियमांचा या कायद्यात समावेश आहे. यात विशेष म्हणजे मंदिराचे व्यवस्थापक हिंदूच हवेत अशी अट या कायद्यात घालण्यात आलेली आहे.

याशिवाय मंदिरात भाविकांना त्रास होऊ नये, गैरवर्तन करणाऱ्यांना मंदिर बंदीचा नियम अशा महत्त्वाच्या तरतुदींचा या कायद्यात समावेश आहे

देऊल ए कवायती कायदा कलम ३६

देऊल ए कवायती कायदा कलम ३६नुसार छत्रपतींना देवीच्या गाभाऱ्यात सोडले नाही. निजामाने बनवलेल्या देवुल ए कवायते कायदा मध्ये १ ते ५६ नियम असुन कलम ३६ हे पुजारी, ब्राम्हण , सेवेदार यांच्यासाठी आहे. गाभाऱ्यात गर्दी होऊ नये म्हणून हे कलम आहे. पाळीचा पुजारी व कमाईसदार हे गाभाऱ्यात थांबू शकतात, असा नियम आहे.

छत्रपती संभाजीराजे
बुद्ध, जैन, बसवेश्वर यांनी आधी विद्रोह केला मग...; आव्हाडांची पवारांना पाठराखण

देऊल ए कवायत हा कायदा उत्तम असून न्यायाची भाषा करणारा हा कायदा असल्याचे येथील पुजारी म्हणतात. मंदिरात शिस्त राहावी, यासाठी कायदा करण्यात आला असून यात काहीही बदल करावा असे वाटत नाही, असेही पूजारी म्हणतात.

मात्र ज्या कायद्याद्वारे संभाजीराजे छत्रपती यांचा प्रवेश रोखला गेला, तो कायदा छत्रपतींना लागू होत नाही, गाभाऱ्यात गर्दी होऊ नये म्हणून हे कलम आहे, असे तेथील पुजारी नागनाथ भाऊ भांजी यांनी स्पष्ट सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com