
पाच हजार यशस्वी प्रसूती करणाऱ्या नर्सचा असा झाला दुर्दैवी अंत
जगभरात 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस (International Nurses Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने परिचारकांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. परिचारिका म्हणजेच नर्स समाजातील असा घटक आहे. ज्या कित्येक रूग्णांची सेवा करतात, त्यांची काळजी घेतात. आज परिचारीकेच्या दिनानिमित्त महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील एका अशा परिचारीकेची कहानी डोळ्यासमोर येते जी आठवल्यावर कोणाच्याही अंगावर काटा येणार.
जवळपास ५ हजार यशस्वी प्रसुती करणारी नर्स ज्योती गवळी हिचा स्वत:च्याच प्रसुती दरम्यान सहा महिन्याआधी मृत्यू झाला होता. आज परिचारीका दिनानिमित्त तिच्या जगावेगळ्या कहानीला पुन्हा उजाळा देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. (a story of Hingoli nurse Jyoti Gawali who assisted around 5000 baby births died during own delivery)
ज्योती गवळी या हिंगोलीच्या नर्सचा गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. ज्योती गवळी गेल्या पाच वर्षांपासून तेथील रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांनी आतापर्यंत जवळपास पाच हजार यशस्वी प्रसुती केल्या होत्या. मात्र स्वत:च्या प्रसूती दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रसूतीत त्यांचं बाळ सुखरुप होतं पण ज्योतीला आपला जीव गमवावा लागला. ज्योतीच्या मृत्यूने अनेकांना त्यावेळी धक्का बसला. इतरांच्या यशस्वी प्रसूतीची हमी देणारी एक नर्स जी अतिशय हूशार होती ती स्वत:च्या प्रसूती दरम्यानच दगावली होती.
ज्योती गवळी यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू कसा झाला?
ज्योती गवळी या सरकारी रुग्णालयात काम करायच्या. स्वत:च्या प्रसूतीसाठी त्याच रुग्णालयात २ नोव्हेंबरला दाखल झाल्या होत्या. प्रसूतीदरम्यान ज्योतींवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र शस्त्रक्रियेनंतर ज्योती यांचं रक्त मोठ्या प्रमाणात गेल्यानं त्यांना नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही.
आज परिचारीका दिनानिमित्त पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या परिचारीकेची कहानी समोर आली. आज जर ज्योती हयात असती तर कित्येक यशस्वी प्रसूत्या केल्या असता. आज समाजात ज्योती सारख्या परिचारीकेची नितांत गरज आहे. परिचारीका दिनानिमित्त तिच्या कार्याचे स्मरण हिच तिला वाहलेली खूप मोठी श्रद्धांजली ठरेल.