
Vidhan Sabha Speaker Election: आज सभागृहात काय होणार?
ज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वेगाने घडामोडी घडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस पुन्हा येण्याची शक्यता असतानाच एक वेगळाच ट्विस्ट आला. फडणवीस आले, पण उपमुख्यमंत्री पदी आणि मुख्यमंत्री पद मिळालं एकनाथ शिंदेंना. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. त्यानुसार रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविले आहे. या अधिवेशनात आज नेमकं काय होणार, याचा हा थोडक्यात आढावा. (What will happen in special session of the legislative assembly)
हेही वाचा: MH Assembly Speaker Election Live: शिंदे गट मुंबईत; चुरशीची लढत रंगणार
या अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी शिवसेनेने ‘व्हीप’ जारी केला आहे. प्रत्येक पक्षाचा व्हीप हा त्या त्या पक्षाच्या आमदारांसाठी बंधनकारक असतो, या ‘व्हिप’चे उल्लंघन केल्यास म्हणजेच मतदानास गैरहजर राहिल्यास किंवा ‘व्हिप’च्या विरोधात उल्लंघन केल्यास संबंधित आमदारावर अपात्रतेची कारवाई होऊन त्याची आमदारकी धोक्यात येऊ शकते.
हेही वाचा: ‘राज्यात काय चाललेय हे जनता बघत आहे’ - जयंत पाटील
या सर्व कायदेशीर बाबी असल्या, तरी आज सभागृहात अध्यक्षांची निवडणूक होईल, त्यांनतर व्हीप न पाळणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाईसंबंधी नवनियुक्त अध्यक्षांकडे मागणी करण्यात येईल. भाजप आणि शिंदे गटाकडे सभागृहात बहुमत असल्याने त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष निवडून येण्याची शक्यता असल्याने कदाचित या निर्णयावर तातडीने निर्णय न होता, तो प्रलंबित ठेवला जाईल. त्यामुळे व्हीप न पाळणाऱ्या आमदारांवरील कारवाई काही काळ तरी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: ३२ माजी नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार; काँग्रेस, शिवसेना, MIMला पडणार खिंडार
शिंदे गटातील १६ आमदारांवर यापूर्वीच पक्षादेश न पाळल्याने अपात्रतेसंबंधी कारवाई सुरु असून त्याला सर्वोच्च न्यायालयात या आमदारांनी आव्हान दिले आहे. याबाबत येत्या ११ तारखेला निर्णय येणे अपेक्षित आहे. न्यायालयाच्या या निर्णयाच्या आधारावरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता असल्याचे विधानभवनातील अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
Web Title: What Will Happen In Special Session Of The Legislative Assembly Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..