Riteish Deshmuk reply:रितेश देशमुख का भडकला त्या पोलीसावर ? म्हणाला 'भर चौकात मारा'.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Riteish Deshmukh angry on police officer how one can that much dengerous..on lalitpur rape case

रितेश देशमुख का भडकला त्या पोलीसावर ? म्हणाला 'भर चौकात मारा'..

रितेश देशमुख हा अभिनेता अत्यंत मजेशिरपणे कुठल्याही गोष्टींना पुढे जाणारा अभिनेता आहे.त्याच्या आणि जेनेलियाच्या आयडिअल जोडीचे तर बॉलीवूडमधे सतत कौतुक होत असते.परंतु यावेळी रितेशचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे.उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने परत एकदा समाजाला हादरवून सोडले आहे.(Gang Rape Case)या घटनेबाबत ऐकून जेवढे वाईट वाटावे त्याच्या दुप्पट रितेशला या घटनेमागे असणाऱ्या क्रूर गुन्हेगारांचा प्रचंड राग आलेला आहे.त्याने या गुन्हेगारांबद्दल काय लिहीलंय त्याच्या ट्वीटरवर ते जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तीच्यावर सामुहिक बलात्कार झाला.(Police Station)ही मुलगी जेव्हा तक्रार करायला पोलीस स्टेशनमधे गेली तेव्हा तीच्या त्या पोलीस अधिकाऱ्यानेही बलात्कार केला.ज्या पोलीसांकडून पिडित मुलीला मदतीची आशा होती,त्यानेच तीच्यावर बलात्कार केला.हे फार निंदनीय आहे.एका वृत्तवाहिणीवर रितेशने जेव्हा ही घटना ऐकली तेव्हा त्याचा राग अनावर झाला.

हेही वाचा: Pune Girl Raped In School : पुण्यात शालेय विद्यार्थिनीवर शाळेतील शौचालयात बलात्कार

संतापलेला रितेश बोलला की,..

"हे जर खरे असेल तर यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसू शकते.रक्षकच भक्षक बनला तर सामान्य माणूस न्याय मागायला तरी कुठे जाणार?अशा लोकांना भर रस्त्यात नेऊन मारायला पाहिजे.शासनाने अशांवर कडक कारवाही करायला पाहिजे.आणि या नराधमांना कठोर शिक्षा द्यायला पाहिजे."

रितेश नेमका कोणत्या घटनेबाबत बोलत होता?

२२ एप्रिलला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पालीतील ४ जणांनी तीच्यावर बलात्कार केला.आरोपीच्या तावडीतून सुटका काढत ही पिडिता पोलीसांकडे न्याय मिळेल या आशेने गेली होती.मात्र न्याय मिळण्याऐवजी तिथेही तीला छळले गेले.तिथे उपस्थित स्टेशन प्रमुख सरोजनेही तीच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.(Gang Rape)चक्क तीन दिवस या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे.

रितेशने या घटनेतील पिडितेला सहानुभूती दाखवत या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत शासनाने अशा नराधमांना कठोर शिक्षा करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: Sakinaka rape case: विकृत वृत्तीला रावणाप्रमाणे जाळाच!

रितेशने या घटनेतील पिडितेला सहानुभूती दाखवत या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत शासनाने अशा नराधमांना कठोर शिक्षा करण्याची विनंती केली आहे.या घटनेने रितेशबरोबर अर्थातच अनेकांना परत एकदा मुलींच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडले आहे.

Web Title: Actor Riteish Deshmukh Angry On Rapiest Police Officer In Lalitpur Gang Rape

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top