Akshay Kumar : अक्षय कुमारची मराठी सिनेसृष्टीत होणार ग्रँड एन्ट्री; शिवरायांची साकारणार भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar as shivaji maharaj

अक्षय कुमारची मराठी सिनेसृष्टीत होणार ग्रँड एन्ट्री; शिवरायांची साकारणार भूमिका

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मराठी सिनेसृष्टीत ग्रँड एन्ट्री होणार आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची भूमिका तो साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात तो ही भूमिका साकारणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमातील सर्व कलारांना बुधवारी एका शानदार सोहळ्यात समोर आणण्यात आलं. मराठी, तेलुगू, हिंदी भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Cabinet Decision: परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; कसे असतील निकष?

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाचा बुधवारी शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते क्लॅप देऊन या सिनेमाच्या शुभारंभ करण्यात आला.

हेही वाचा: Thackeray-Ambedkar Alliance: ठाकरे-आंबेडकर येणार एकत्र; राज्यात नव्या युतीचे संकेत

वसिम कुरेशी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. याचे लेखक पराग कुलकर्णी आहेत तर संगीत हितेश मोडक यांनी दिलं आहे. गणेश आचार्य यामध्ये नृत्याची जबाबदारी सांभाळणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. पुढील वर्षी दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

कुठले कलाकार साकारणार शिवरायांचे सात मावळे?

१) विराज मडके - जीवाजी पाटील

२) सत्या मांजरेकर - दत्ताची पागे

३) हार्दीक जोशी - मल्हारी लोखंडे

४) जय दुधाने - तुळजा जामकर

५) विशाल निकम - चंद्राजी कोठार

६) उत्कर्ष शिंदे -सूर्याजी

७) प्रवीण तरडे - प्रतापराव गुजर

टॅग्स :EntertainmentManoranjan