
ऑरमॅक्स मीडियानं सर्वेक्षणानंतर दहा प्रसिद्ध अभिनेत्रींची लिस्ट जाहिर केली आहे. यामध्ये आलिया भट्ट,कतरिना कैफ,दीपिका पदुकोण,क्रिती सनन,कियारा अडवाणी,श्रद्धा कपूर अशी नाव आहेत. आलियानं कतरिना,दीपिका,प्रियंकाला मागे टाकत नंबर वन पद मिळवलं आहे. सध्या आलिया तिच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'RRR' या सिनेमांमुळे चर्चेत आहे. सध्याची बॉलीवूडमधली ती नंबर वन अभिनेत्री आहे यात कोणतीच शंका नाही.
कतरिना कैफ
कतरिनानं या सर्वेक्षणात नंबर 2 ची जागा पटकावली आहे. अभिनेत्री सध्या तिच्या विकी कौशलसोबतच्या लग्नामुळे खूपच चर्चेत आली आहे. पण त्याचबरोबर 'टायगर ३' आणि 'मेरी ख्रिसमस' या दोन सिनेमांमुळेही तिच्या कामाला घेऊन लोकांमध्ये उत्सुकता आहे.
दीपिका पदुकोणचा 'गहराइयां' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यातील दीपिकाच्या हॉट लूकसोबत बोल्ड सीनची भलतीच चर्चा झाली. अभिनेत्रीनं सर्वेक्षणात 3 रा क्रमांक पटकावला आहे. दीपिकाला उत्तम फॅशन कळते. तिच्या कपड्यांवरुन जशी तिची प्रशंसा केली जाते तेवढंच तिला ट्रोलही केलं जातं. 'गहराइयां' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तिनं घातलेल्या फॅशनेबल आऊटफिट्सनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
क्रिती सनन
नवीन वर्षात अजुनतरी किर्तीच्या कामाची अर्थात सिनेमांची काही चर्चा नाही. पण तरीसुद्धा तिनं नंबर ४ पटकावला आहे.
श्रद्धा कपूर
क्रिती प्रमाणेच सध्या श्रद्धाच्या देखील कुठल्या सिनेमाची चर्चा नाही. ना श्रद्धा कुठल्या वादामुळेही चर्चेत आहे. पण तिचं फॅन फॉलॉइंग मात्र जबरदस्त आहे. आणि म्हणूनच ऑरमॅक्सच्या सर्वेक्षणात तिनं पहिल्या दहा मधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये नंबर पटकावला आहे.
कियारा कार्तिक आर्यनसोबत 'भूलभूलैय्या २' मध्ये दिसणार आहेच पण ती त्याच्यासोबत आणखी एका सिनेमात दिसणार आहे. त्याचसोबत सध्या तिची चर्चा आहे सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या तिच्या नात्यामुळे. टॉप १० मध्ये ती आहे ६ व्या क्रमांकावर
करिना कपूर खान नेहमीच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे आपलं लक्ष वेधून घेत असते. किंवा मग तिच्या फोटोंमुळे देखील ती चर्चेत असते. आमिरसोबत 'लालसिंग चड्ढा' सिनेमात ती दिसणार आहे. टॉप टेनमध्ये मात्र ती सातव्या नंबरवर घसरलेली दिसून आलं आहे.
प्रियंका चोप्रा सध्या चर्चेत आहे ते सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्यामुळे. सध्या ती आपल्या बाळासोबत मातृत्वाचा आनंद घेत आहे. ती आहे आठव्या क्रमांकावर.
दिशा पटानी
दिशा पटानी आहे ९ व्या क्रमांकावर. तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. खासकरुन तिचे बिकीनीतील फोटो अधिक पसंत केले जातात.
सारा अली खानचा 'अतरंगी रे' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्या सिनेमातील साराचं 'चका चक' सॉंग खूप गाजलं आणि अजूनही त्यातल्या हूकअप स्टेपवर तिचे चाहते ताल धरताना दिसतात. अभिनेत्रीला या सर्वेक्षणात १० व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.
बॉलीिवूडच्या टॉप टेन अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. अजूनही या लिस्टपासून जान्हवी कपूर मात्र दूर आहे. पण इथे गणितं बदलत असतात. कोण जाणे पुढच्या लिस्टमध्ये कदाचित आलियाला चॅलेंज करणारं,नंबर वन पदावर कुणी दुसरी अभिनेत्रीही दावेदार ठरू शकते. शेवटी ही मायानगरी आहे बॉस...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.