Ramayana: रणबीरच्या रामायणात आता बिग बींची एन्ट्री? कोणती भूमिका साकारणार यावरुन चर्चेला उधाण

Ramayana: नितेश तिवारीच्या (Nitesh Tiwari) रामायण (Ramayana) या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली आहे, असं म्हटलं जात आहे.
Ramayana
Ramayana

Ramayana: दिग्दर्शक नितेश तिवारीच्या (Nitesh Tiwari) रामायण (Ramayana) या चित्रपटाच्या स्टार कास्टची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर हा प्रभू श्री राम यांची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जातंय तर चित्रपटातील सीतेची भूमिका साई पल्लवी साकारणार आहे, अशी चर्चा आहेत. तसेच यश (Yash), सनी देओल (Sunny Deol), लारा दत्ता (Lara Dutta) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हे कलाकार देखील या चित्रपटातील महत्वाची भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात आहे. आता या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली आहे, असं म्हटलं जात आहे.

राजा दशरथाची भूमिका साकारणार बिग बी?

झूमच्या रिपोर्टनुसार, रामायण या चित्रपटातील राजा दशरथ ही भूमिकेची ऑफर अमिताभ बच्चन यांना देण्यात आली आहे. पण अजून अमिताभ बच्चन यांनी कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.

कधी सुरु होणार चित्रपटाचं शूटिंग?

मार्च 2024 मध्ये रामायण या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये दिवाळीत रिलीज करण्याचा निर्णय या चित्रपटाच्या टीमनं घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात तीन भाग असमार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Ramayana
Sunny Deol In Ramayana Movie: सनी 'हनुमानाची' भूमिका साकारणार हे फिक्स, पण...!

'रामायण' ची स्टार कास्ट

चित्रपटातील रावणाची भूमिका यश हा साकारणार असून हनुमान ही भूमिका सनी देओल साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. तर रिपोर्टनुसार, कैकेयी ही भूमिका लारा दत्ता साकारणार आहे.

रणबीरचा 2022 मध्ये ब्रह्मास्त्र हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात रणबीर आणि अमिताभ बच्चन यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यानंतर रणबीरचा अॅनिमल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता रणबीरच्या रमायण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com