Viral Photo : कोण आहे ओळखून दाखवा? अशी अवस्था कशी झाली?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंनं नेटकऱ्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. अनेक जण त्या अभिनेत्याला ओळखण्यास चुकले आहेत.
Viral Photo
Viral Photoesakal

Bollywood guess Real photo : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या अभिनेत्याच्या फोटोंनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो फोटो कुण्या हॉलीवूडच्या अभिनेत्याचा नसून प्रसिद्ध बॉलीवूडच्या अभिनेत्याचा आहे. तो फोटो पाहताच अनेकांनी बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. मात्र प्रत्यक्षात तो फोटो एका वेगळ्याच अभिनेत्याचा आहे हे त्यांना कळताच मोठा धक्का बसला आहे.

बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो प्रेक्षकांना कोड्यात पाडतात. लक्ष वेधून घेतात. आपल्याला वाटते तो फोटो ओळखीचा आहे. एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रेटीचा आहे. प्रत्यक्षात तो फोटो तिसऱ्याच व्यक्तीचा असतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंनं नेटकऱ्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. अनेक जण त्या अभिनेत्याला ओळखण्यास चुकले आहेत.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

फोटो पाहून नेटकरी गोंधळून गेले आहेत.....

तो फोटो आहे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेशचा आहे. त्याचा तो फोटो ओळखणं हे भल्या भल्यांना शक्य झाले नाही. सोशल मीडियावर त्याचा तो व्हायरल झालेला फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. यापूर्वी देखील निल नितीन मुकेशच्या अशा अजब फोटोंनी चाहत्यांना गोंधळात टाकले होते. त्यामुळे चाहत्यांचा मोठा गोंधळ उडाला होता.

Viral Photo
The Kerala Story नंतर आता पुन्हा होणार लव-जिहाद वरनं राडा..'या' नव्या सिनेमानं फुंकलं वादाचं रणशिंग

सोशल मीडियावर तो फोटो तुफान व्हायरल झाला असून त्यात अनेकांनी तो फोटो बिग बी अमिताभ बच्चन यांचा असल्याचे म्हटले आहे. काही जणांनी तो अक्षय कुमार असल्याचे सांगितले आहे. सरतेशेवटी निल नितिन मुकेशचा तो फोटो असल्याचे सांगताच अनेकांना धक्का बसला आहे. कुणाचाही विश्वास बसणार नाही अशा त्या फोटोची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

Viral Photo
Raveena Tondon : म्हातारी म्हणू नका, अजुनही करतेय काळजाचं पाणी!

एकानं लिहिलं आहेस की, देवा तू तर अद्भुत दिसत आहेस. आम्हाला तुला ओळखणं कठीण झालं आहे. आम्हाला तू कोण आहेस हे ओळखता आलेले नाही हे मान्य करायला हवं. आम्ही तुला बिग बी अमिताभ बच्चन समजून बसलो. पण तुझा तो लूकच असा आहे की, कुणीही त्यावरुन फसेल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com