Asees Kaur Wedding : 'रातां लम्बिया' फेम सिंगर असीसचं लग्न लागलं! कोणाला नाही सांगितलं

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या शेरशाह चित्रपटामधील राता लंबिया गाण्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
Asses Kaur Raatan Lambiyan Fame Singer Got Married
Asses Kaur Raatan Lambiyan Fame Singer Got Marriedesakal

Asses Kaur Raatan Lambiyan Fame Singer Got Married : बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका असीस कौरनं तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. असीसनं तिच्या लग्नाची बातमी सांगून चाहत्यांना गोड धक्का दिला आहे. तिनं काल म्युझिक कंपोझर गोल्डी सोहेलसोबत लग्न केले आहे. शेरशाह मधील राता लंबिया या गाण्यानं लोकप्रियता मिळवलेल्या असीसच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या शेरशाह चित्रपटामधील राता लंबिया गाण्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ते गाणे असीस कौरनं गायलं होतं. आता असीस विवाहबद्ध झाली असून चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

Asses Kaur Raatan Lambiyan Fame Singer Got Married
Adipurush Review : वेगळेपणाच्या नावाखाली फसलेला 'आदिपुरुष'! सगळं गंडलयं...

कुठं जाणार हनिमूनला....?

असीस कौर आणि गोल्डी गेल्या सात वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांची लवस्टोरी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सोशल मीडियावर त्यांचे व्हायरल झालेल्या फोटोंमुळे वेगळ्याच चर्चेला काही दिवसांपासून उधाण आले होते. अखेर ते विवाहबद्ध झाले असून त्यांच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. यानंतर हे दोघे सेलिब्रेटी अमृतसर येथील स्वर्ण मंदिरात जाणार आहेत.

Asses Kaur Raatan Lambiyan Fame Singer Got Married
Adipurush Controversy : 'हनुमान काय बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे का?' काहीही दाखवता राव!

असीस ही येत्या काही दिवसांमध्ये लंडनमध्ये परफॉर्म करणार असून यावेळी ती दिवंगत अभिनेता सिद्धू मुसेवाला श्रद्धांजली वाहणार आहे. लंडनमधील कॉन्सर्ट संपल्यानंतर असीस ही गोल्डीसोबत हनिमुनला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोशल मीडियावर असीसच्या व्हायरल झालेल्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

असीसनं गायलेली गाणी...

असीसच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, तिनं तमंचे मधील दिलदारा रिप्राईज गाणं गात चाहत्यांची मोठया प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. याशिवाय बोलना (कपूर अँड सन्स) राता लंबिया (शेरशाह), बंदेया रे बंदेया आणि तेरे बिन (सिंबा), वे माहि (केसरी) यासारख्या चित्रपटांतील गाण्यांना श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र यासगळ्यात असीसच्या राता लंबिया गाण्यानं धुमाकूळ घातला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com