देशभरामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढताना (covid 19 raised) दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं सर्वांना काळजीत पाडलं आहे. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांना देखील पुन्हा वेगानं (entartainent) कोरोना झाला आहे. टीव्ही, चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रेटींना कोरोनानं (bollywood celebrity) ग्रासल्याची बातमी समोर आली आहे. त्यामध्ये बाहुबलीमधून लोकप्रिय झालेल्या कटाप्पाला कोरोनाची लागण झाली आहे. कटाप्पा उर्फ सत्यराज यांना एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
सत्यराज (satyaraj) यांची प्रकृती खालावत चालल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. त्यांनी सत्यजित यांना बरे वाटावे म्हणून देवाचा धावा सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव कमालीचा वाढला आहे. त्याच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी आले आहेत. करण जोहरच्या पार्टीपासून बॉलीवूडमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. त्यानंतर अनेक सेलिब्रेटी वेगानं कोरोनाबाधित होत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
सेलिब्रेटींनी चाहत्यांना कोरोनाच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आता अभिनेत्री हिना आणि तिचे कुटूंबीय यांनाही कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. कटाप्पा यांच्याविषयी अधिक माहिती सांगायचे झाल्यास त्यांना सध्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. मात्र अजून त्यांची प्रकृती काही प्रमाणात चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं अजून कोणत्याही प्रकारचे अधिकृत स्टेटमेंट जाहीर करण्यात आलेलं नाही. 7 जानेवारीला कटाप्पा यांना एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.