Bigboss 13 : महिराचे चाहते सलमानवर नाराज; #InstandForMahira ट्विटरवर ट्रेंड

टीम ई-सकाळ
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

बिगबॉस13 मध्ये या आठवड्यात चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे महिर शर्मा आणि सिद्धार्थ शुक्ला यांची फाईट. याच फाईटवरून शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने दोघांची शिकवणी घेतली. पण, सलमानच्या बोलण्यामुळे भाऊक झालेली माहीरा अक्षर रडायला लागली. त्यामुळे माहिराच्या चहात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

बिगबॉस13 मध्ये या आठवड्यात चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे महिर शर्मा आणि सिद्धार्थ शुक्ला यांची फाईट. याच फाईटवरून शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने दोघांची शिकवणी घेतली. पण, सलमानच्या बोलण्यामुळे भाऊक झालेली माहीरा अक्षर रडायला लागली. त्यामुळे माहिराच्या चहात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माहेरची बाजू योग्य असून त्यांनी ट्विटरवर #IstandForMahira असा ट्रेंड सुरू केला आहे.

बालाने मारला बॉक्स ऑफिसवर डल्ला 

एका टास्कदरम्यान, सिद्धार्थ आणि माहिरा यांच्यामध्ये खेचाखेची झाली होती. सिद्धार्थ त्याच्या हातातील पोते जोरात खचल्याने माहिरा जमिनीवर पडली. त्यानंतर महिराने रागाच्या भरात शिव्या दिल्या तोडफोड देखील केली होती.

 

 

म्हणून अनुष्का वापरते विराटचे कपडे

यावरून सलमान महिराला म्हणाला,"तू नेहमी सिसिद्धार्थला टार्गेट का करतेस. तुला माहित आहे तो तुझ्या पेक्षा स्टाँग आहे तर तू ते पोते सोडून द्यायला हवे होते." सलमान खान याने सिद्धार्थला देखील सुनावले. त्याला म्हणाला, तुला टास्क दरम्यान खासकरून महिला सदस्य सोबत असताना तुझा जोश सांभाळता यायला हवा." सलमान खानने यांमुद्द्यावरून दोघांना सुनावले. पण महिराच्या चाहत्यांना मात्र ते रुचले नाही. त्यांनी महिराची बाजू घेत सलमान खानला ट्रोल केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 13 instandformihira twitter trend india

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: