तेजस्वी - करणचं लग्न? घरच्यांनी दिली प्रतिक्रिया, जर सगळं....|Bigg Boss Winner Tejasswi Prakash Karan Kundra Wedding Family | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejasswi Prakash And karan Kundra
तेजस्वी - करणचं लग्न? घरच्यांनी दिली प्रतिक्रिया, जर सगळं....

तेजस्वी - करणचं लग्न? घरच्यांनी दिली प्रतिक्रिया, जर सगळं....

Bigg Boss Season 15: बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश ही आता लाईमलाईटमध्ये (Bigg Boss Season 15) आली आहे. तिच्यावर कौतूकाचा (Raction of tejkaran) वर्षाव होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर (Viral On Social Media) तिच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अजून तिचा कौतूक सोहळा सुरु असताना तेजस्वीच्या (Tejasswi Prakash) लग्नाच्या बातम्या समोर आल्या आहेत. तिचं आणि करण कुंद्रा (Karan Kundra) यांचं लग्न होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यावर तेजस्वीच्या कुटूंबियांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या या नात्यावर सुचक वक्तव्य केलं आहे.

बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये तेजस्वी आणि प्रतिक सहेजपाल यांच्यात कमालीची चुरस दिसून आले होते. अनेकांना प्रतीक सहेजपाल विजयी होणार असे वाटले होते. मात्र त्यांचा अंदाज चुकला आणि तेजस्वीनं विजेतेपद पटकावलं. त्यावरुन दोन दिवसांपासून नेटकऱ्यांनी बिग बॉस आणि संबंधित वाहिनीवर टीका करायला सुरुवात केली होती. पक्षपातपणा झाल्याची त्यांची प्रतिक्रियी होती. यासगळ्यात तेजस्वी आणि करण कुंद्राची लवस्टोरी बिग बॉसच्या घरात फुलत होती याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा रंगण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा: भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

फॅन्स आता त्या दोघांना तेजरन या नावानं ओळखू लागले आहेत. त्या नावाचा वेगळा ट्रेंडही सुरु झाला आहे. तेजस्वी आणि करण कुंद्राच्या लग्नावर त्यांच्या कुटूंबियांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते या लग्नाला तयार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी त्या दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले होते. 30 जानेवारीच्या ग्रँड फिनालेमध्ये तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे घरचे देखील सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना पॅपराझींना काही प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी आम्ही त्या दोघांशी बोलणार असून लवकरात लवकर त्यांचे लग्न लावून देण्याचा विचार करत आहे. जर सगळे काही जुळून आले तर आम्ही त्या प्रस्तावाचा विचार करणार असल्याचेही कुंद्रा कुटूंबियांकडून सांगण्यात आले होते.

हेही वाचा: असा ड्रायव्हर कधी पाहिला नसेल! काय टर्न घेतलाय; Video Viral

Web Title: Bigg Boss Winner Tejasswi Prakash Karan Kundra Wedding Family Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top