Randeep Hooda
Randeep Hooda esakal

रणदीप हुडा साकारणार 'वीर सावरकर, महेश मांजेरकरांकडून 'बायोपिक'

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील (Mahesh Manjrekar) बायोपिकची निर्मीती करणार आहेत.

Entertainment News: मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील (Mahesh Manjrekar) बायोपिकची निर्मीती करणार आहेत. त्यासंबंधीची घोषणा यापूर्वी त्यांनी केली होती. मात्र सावरकरांच्या भूमिकेत कोण असणार याविषयी (Bollywood Actor) कोणत्याही प्रकारची माहिती शेयर केली नव्हती. आता सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) हा सावरकरांची भूमिका साकारणार असल्याची बातमी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर काही वेळातच रणदीपवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित आणि संदीप सिंग यांनी केली आहे.

मांजरेकर यांच्या या बायोपिकमध्ये सुरुवातीला प्रख्यात अभिनेता आयषमान खुराणा भूमिका करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चाही होती. मात्र आता रणदीपच्या ऑडिशननंतर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रणदीपनं देखील त्याच्या इंस्टावरुन एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्याच्या त्या लूकवरुन आपण आगामी बायोपिकमधील त्याच्या भूमिकेची कल्पना करु शकतो. सावरकरांच्या बायोपिकमध्ये त्यांच्या आयुष्यातील महत्वांच्या घडामोडींचा उल्लेख करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला जुनमध्ये सुरुवात होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान - निकोबारमध्ये या बायोपिकचे चित्रिकरण केले जाणार आहे.

Randeep Hooda
Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

जेव्हा रणदीपला सावरकरांची भूमिका करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यानं प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात तो म्हणतो, देशात असे काही नायक आहेत त्यांची भूमिका आपल्याला करायला मिळणं ही खरचं गौरवास्पद बाब आहे. मला ही भूमिका करायला मिळते आहे याचा आनंद मोठा आहे. मी आता त्याची तयारी सुरु केली आहे. विनायक दामोदर सावरकर हे अजुनही आपल्याला बऱ्याचअंशी अज्ञात आहेत. त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. निर्माते संदीप यांच्यासोबत मी यापूर्वी सरबजीत सिंग नावाचा चित्रपट केला होता. आता पुन्हा एकदा नव्या भूमिकेत काम करायला मिळते आहे याचा आनंद आहे.

Randeep Hooda
Viral Video : लग्नात नववधू 'Out Of Control' अन् मग...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com