जॅकलीनची आई रुग्णालयात दाखल, हदयविकाराचा झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जॅकलीन फर्नांडिझ
जॅकलीनची आई रुग्णालयात दाखल, हदयविकाराचा झटका

जॅकलीनची आई रुग्णालयात दाखल, हदयविकाराचा झटका

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझला (bollywood actress jacqueline fernandez) मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारण म्हणजे तिच्या आईला हदयविकाराचा मोठा झटका (heart attack) आला आहे. आणि त्यांना एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या जॅकलीन ही तिच्या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी भारतात आहे. तर तिची आई श्रीलंकमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं श्रीलंकेमधील परिस्थितीही भलतीच बिकट झाली आहे. कोरोनानं तर या देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडून टाकली आहे. त्यामुळे येत्या काळात या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरं जायचं असा प्रश्न या देशातील नागरिकासमोर आहे.

जॅकलीनची (jacqueline fernandez) आई या बहरीन मध्ये राहतात. त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडे जॅकलीनला जाता येईल किंवा नाही याबाबत सांगता येणार नाही. कारण दिवसेंदिवस भारतात देखील कोरोनाची परिस्थिती बदलताना दिसत आहे. अशावेळी परदेशी जाण्यासाठी देखील वेगळी नियमावली अंमलात आणण्याच्या सुचना केंद्रीय प्रशासनानं दिल्या आहेत. दुसरं कारण म्हणजे जॅकलीनच्या मागे ईडीचा ससेमिरा आहे. तिला काही दिवसांपूर्वी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीनं सांगितलेल्या नियमांनुसार तिला भारत सोडण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: कंगणाने केली पुन्हा टिवटिव; '' India Reject Bollywood'' हॅशटॅग मधून निषेध

यापूर्वी जॅकलीनला डिसेंबरमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी आपल्या देशात जायचे होते. मात्र त्यावेळी ईडीनं तिची अडवणूक केली होती. सध्या तिची चौकशी सुरु असल्यानं तिला देश सोडून जाता येणार नाही. असंही ईडीनं सांगितलं होतं. दोनशे कोटींचा अपव्यवहार करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर सोबत जॅकलीनचं नाव जोडण्यात आलं होतं. जॅकलीन आणि सुकेश यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानं तिची भेट घेऊन तिला महागड्या वस्तुंची भेटही दिली होती. असं तपासातून समोर आले होते.

हेही वाचा: धक्कादायक! दहा अभिनेत्रींची तिहारमध्ये सुकेश चंद्रशेखरशी भेट

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top