अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मराठी चित्रपटाच्या प्रेमात; वाचा काय म्हणाली जॅकलिन

संतोष भिंगार्डे
Friday, 7 August 2020

जॅकलिन म्हणाली, की मराठीमध्ये विविध विषय हाताळले जात आहेत. मराठी चित्रपट खूप प्रगती करत आहे, याचा मला आनंद होतो.

मुंबई : श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन फर्नांडिसने आतापर्यंत विविध चित्रपट केले आहेत. सलमान खानबरोबरचा तिचा 'किक' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मध्यंतरी तिने 'मिसेस सिरियल किलर' नावाच्या वेबसिरीजमध्येही काम केले. तिचे वेबविश्वातील पदार्पण यशस्वी ठरले. आता तिने एका मराठी चित्रपटाच्या समर्थनार्थ घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मुख्य प्रवाहातील एका अभिनेत्रीने हा पुढाकार घेतला आहे. 

रुग्णालयाने बिलासाठी डिस्चार्ज नाकारला; नगरसेवकाने पीपीई कीट घातली आणि रुग्णाला चक्क उचलून बाहेर आणले

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आता मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमात पडली आहे. व्हेनिस चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा 'द डिसायपल' या चित्रपटाची निवड झाल्यामुळे तिने या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तब्बल वीस वर्षांनी एका भारतीय आणि तेदेखील मराठी चित्रपटाची या महोत्सवात निवड झाली आहे ही संपूर्ण भारतीयांना अभिमानाची बाब आहे, असे ती सांगते.

खासगी रुग्णालयाच्या अवाजवी शुल्क आकारणीला बसणार चाप; राज्य सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

जॅकलिन म्हणाली, की मराठीमध्ये विविध विषय हाताळले जात आहेत. मराठी चित्रपट खूप प्रगती करत आहे, याचा मला आनंद होतो. व्हेनिस चित्रपट महोत्सव अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा आहे. तेथे मराठी चित्रपटाची वर्णी लागली याचा मला खूप आनंद होतो आहे. भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. प्रादेशिक सिनेमा मोठा होतो आहे ही चांगली गोष्ट आहे.  

पाऊस तर ओसरला; मुंबईत आता मात्र डेंगी, लेप्टोचा वाढता धोका

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेने यापूर्वी कोर्ट हा चित्रपट बनविला होता. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरविला गेला होता. भारतातर्फे आॅस्करसाठी अधिकृत एन्ट्री म्हणून हा चित्रपट पाठविण्यात आला होता. त्यानंतर चैतन्य कोणता चित्रपट बनविणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. तब्बल पाचेक वर्षांनी त्याने द डिसायपल हा चित्रपट बनविला आहे. त्याने आता मोठी भरारी घेतली आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actress jaqueline fernadese praises marathi film and says more about it