esakal | सेलिब्रिटींचे रक्षाबंधन; कलाकार भावा-बहिणींमध्ये आहे अतूट नाते....
sakal

बोलून बातमी शोधा

सेलिब्रिटींचे रक्षाबंधन; कलाकार भावा-बहिणींमध्ये आहे अतूट नाते....

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते असे आहेत की त्यांच्या बहिणींनी येथील लाईमलाईटपासून नेहमीच दूर राहण्याचा विचार केला. त्यांच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे आणि आत्मविश्वासही तरीही त्यांनी वेगळे क्षेत्र निवडले आणि तेथे भरारी घेतली.

सेलिब्रिटींचे रक्षाबंधन; कलाकार भावा-बहिणींमध्ये आहे अतूट नाते....

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई ः रक्षाबंधनाचा सण सगळीकडे उत्साहात साजरा झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत हा सण तितक्याच आनंदात साजरा करण्यात आला. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते असे आहेत की त्यांच्या बहिणींनी येथील लाईमलाईटपासून नेहमीच दूर राहण्याचा विचार केला. त्यांच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे आणि आत्मविश्वासही तरीही त्यांनी वेगळे क्षेत्र निवडले आणि तेथे भरारी घेतली. असेच काही प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या बहिणींबद्दल जाणून घेऊया...

सलमान खानला दोन बहिणी आहेत. त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव अलविरा खान आहे तर छोट्या बहिणीचे नाव अर्पिता खान असे आहे. या दोघी बहिणी लाईमलाईटपासून दूर राहिल्या आहेत. अलविराने अभिनेता अतुल अग्निहोत्रीबरोबर लग्न केले आहे. अलविरा फॅशन डिझायनर आहे आणि चित्रपटांची निर्मितीही ती करते. अर्पिताने अभिनेता आयुष शर्माबरोबर लव कम अॅरंज मॅरेज केले आहे. ती इंटीरियर डिझायनर आहे. या दोघी बहिणी सलमानच्या खूप लाडक्या आहेत.

लॉकडाऊनमध्येही गुटख्याची तस्करी जोरात; ठाण्यात पुन्हा एकदा लाखोंचा मुद्देमाल जप्त....

बॉलीवूडचा बादशाह खान शाहरुखच्या मोठ्या बहिणीचे नाव आहे शहनाज लालारुख. शहनाजने शाहरुखच्या चांगल्या आणि वाईट दिवसांमध्ये त्याला साथ दिली आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर ती डिप्रेशनमध्ये होती. त्यानंतर ती शाहरूखबरोबर मन्नतवर राहते आहे. शाहरूखने तिची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे.

बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारच्या बहिणीचे नाव अलका भाटिया असे आहे. ती अक्षयपेक्षा लहान आहे. या बहिण आणि भावाची बॉण्डिग खूप चांगली आहे. अलकाने बिजनेसमन सुरेंद्र हिरानंदानीबरोबर लग्न केले आहे. ती फिल्म प्रॉडक्शनमध्ये काम करते. तिने आपल्या प्रॉडक्शनमध्ये 'फगली' हा चित्रपट बनविला होता.

सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांचा 'मोठा' खुलासा, उघड केली 'ही' माहिती...

अभिनेता हृतिक रोशनच्या मोठ्या बहिणीचे नाव सुनैना रोशन. सुनैना आपल्या पतीपासून वेगळी झाली आहे आणि सध्या ती कॅन्सरशी लढा देत आहे. तिने काईट्स आणि क्रेजी ४ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण कधी अभिनय करावा असे तिला वाटले नाही. हृतीकच्या अधिक ती जवळ आहे आणि त्याची ती लाडकी आहे.

मस्तमौला अभिनेता रणवीर सिंह याच्या बहिणीचे नाव रितिका भावनानी आहे. ती रणवीरपेक्षा मोठी आहे. रितिकाला प्राणी खूप आवडतात. तिला चित्रपट पाहण्याचा व संगीत ऐकण्याचा शौक आहे. रणवीर आपल्या आईला बडी मॉं आणि बहिणीला छोटी मॉं असे संबोधतो. ती एक बिझनेसवूमन आहे. चित्रपट क्षेत्रापासून दूर आहे.

विमान प्रवाशांचा केला सर्व्हे, उत्तरं ऐकून विमान कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली

अर्जुन कपूरच्या बहिणीचे नाव अंशुला कपूर. ती कोलंबिया युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झाली आहे. बॉलीवूडमध्ये तिला काही रस नाही. अंशुला व अर्जुन बोनी कपूरची पहिली पत्नी मोना कपूरची मुले आहेत. अंशुलाचा मोठा व्यवसाय आहे.

अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन-नंदा. या दोघांमधील बॉण्डिंग कमालीची आहे. अभिषेकचे बहिणीवर खूप प्रेम आहे. तिचेही आपल्या भावावर प्रेम आहे. श्वेताच्या घरात स्टार्स आहेत पण तिला कधी चित्रपटात काम करावे असे वाटले नाही. श्वेता क्लोदिंग लाइनशी जोडलेली आहे. तिने आताच एक स्टोअर उघडला आहे.

गणेश उत्सव २०२० : 'हा' बाप्पा दरवर्षी मुंबई ते काश्मीर करतो प्रवास, यंदाही परंपरा अखंडित...

अभिनेता रणबीर कपूरच्या मोठ्या बहिणीचे नाव रिद्धिमा कपूर. तिने दिल्लीतील बिजनेसमन भरत साहनीबरोबर लग्न केले आहे. तिला एक मुलगीही आहे. समारा असे तिचे नाव. रिद्धीमा एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे.
-----
संपादन ः ऋषिराज तायडे