ठरलं तर..! शाहरूख खान करणार जोरदार कमबॅक; चित्रपटाचे नावही निश्चित

ठरलं तर..! शाहरूख खान करणार जोरदार कमबॅक; चित्रपटाचे नावही निश्चित

मुंबई : कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक उद्योग, कार्यालये, व्यवसाय टप्प्याटप्याने सुरु होत आहे. मालिकांच्या तसेच चित्रिकरणालाही अटी-शर्थींसह चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली असून नवनवीन चित्रपटांच्या घोषणाही केल्या जात आहे. अशातच आता बॉलीवूडचा किंग खान शाहरूख यशराज बॅनर्सच्या चित्रपटाद्वारे जोरदार कमबॅक करणार आहे. ही अॅक्शनबाज फिल्म असून यामध्ये शाहरूख अॅक्शन करणार आहे.

'पठाण' असे या चित्रपटाचे नाव आहे. 'वॉर' चित्रपट दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. पुढील महिन्यात हा चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आनंद एल. राय यांच्या सन 2018 मध्ये आलेल्या 'झिरो' या चित्रपटानंतर किंग खान कोणत्या चित्रपटातून कमबॅक करणार याची उत्सुकता अनेकांना लागलेली होती. 

राजकुमार हिरानीची एक स्क्रीप्ट शाहरूखला पसंत होती आणि त्या चित्रपटात त्याने काम करण्यास होकार दिला होता. ही एक सामाजिक विषयावरील फिल्म होती आणि या फिल्मचे शूटिंग कॅनडात होणार होते. परंतु अजूनही कोरोना महामारीमुळे तेथील चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट आता लांबणीवर पडलेला आहे आणि आता किंग कान यशराजची फिल्म करणार आहे. यापूर्वीही किंग खानने यशराजचे चित्रपट केले आहेत आणि त्याला घवघवीत यश मिळालेले आहे. आताही त्याला पठाण या चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली आहे आणि त्याने या चित्रपटात काम करण्यास दर्शविला आहे असे सूत्रांनी सांगितले. 

आता त्याच्याबरोबर नायिका कोण असणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीपिका पदुकोन आणि अनुष्का शर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दीपिकाने प्रभासबरोबरच्या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये घेतले आहेत आणि एवढी रक्कम यशराज तिला देईल असे वाटत नाही. तरीही तिचे नाव आघाडीवर आहे. अनुष्का शर्माचेहीनाव खूप चर्चेत आहे. कदाचित ही आघाडीची दोन्ही नावे बाजूला पडतील आणि यशराज एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देईल असेही बोलले जात आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि पुढील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी अर्थात गांधी जयंती दिनी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com