लॉकडाऊनमध्येही बिझी होता बॉलीवूड; कुणी स्क्रीप्ट वाचली, तर कुणी... 

lights-camera-action.
lights-camera-action.

मुंबई : लॉकडाऊनला आता चार महिने झाले आहेत. आता हळूहळू शूटिंग सुरू झाली असली तरी या कालावधीत सेलिब्रेटी काही ना काही काम करीतच होते. कुणी स्क्रीप्ट वाचत होते,  कुणी भूमिकेचा अभ्यास करीत होते तर कुणी पुढील चित्रीकरणाबाबतीत विचारविनिमय करीत होते. 

जॉन अब्राहम आणि सत्यमेव जयतेची निर्मिती टीम एकमेकांच्या सतत संपर्कात होते. करण जोहर, झोया अख्तर आणि अन्य दोन कलाकारांनी एकत्र येत जेव्हा कोरोना योद्धांसाठी निधी उभारणीचे काम केले त्यावेळीच त्यांच्यामध्येही एका मोठ्या प्रोजेक्टवर चर्चा झाल्याचे समजते. कंगना रानौतने आनंद एल. राय यांच्या 'तनू वेडस मनू'च्या पुढील भागाची स्क्रीप्ट वाचली व चर्चा केली. निर्माती अश्विनी अय्यरने आलिया भटशी एका नवीन विषयावर चर्चा करीत काही बाबतीत अंतिम निर्णय झाल्याचे समजते. दीपिका पदुकोनने तर याच कालावधीत तीन स्क्रिप्ट वाचल्या असून त्यावर चर्चाही केल्या आहेत. तिग्मांशू धुलिया यांनीही एका डाकूच्या आयुष्यावर बेतलेल्या स्क्रिप्टची निर्मात्यांसमवेत चर्चा केली.

आलिया भट म्हणाली, की स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मी गिटार शिकले. शिवाय माझ्याकडे काही चित्रपटांच्या स्क्रीप्ट आलेल्या होत्या त्या सगळ्या वाचून काढल्या आहेत. त्यातील एखादा चित्रपट नक्कीच करणार आहे. दीपिका पदुकोनने आतापर्यंत केले नाही इतके घरकाम केले आहे. जॉन अब्राहमचा बराचसा वेळ फिटनेसमध्ये गेला आहे. शिवाय चित्रपटांच्या प्रोजेक्टवर त्याने काम केले आहे. तो सांगतो, की मी चांगल्या स्क्रीप्ट निवडल्या आहेत आणि भविष्यात त्यांच्यावर चित्रपट येणार आहे. अभिनेत्री अनन्या पांडे वाचनात अधिक रमली. अधिकाधिक पुस्तकांचे वाचन तिने केले. अन्य कलाकारही काही ना काही करीतच होते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ते अधिक बिझी होते. 

पोस्ट प्रॉडक्शनचे काम जोरात
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही फिल्मच्या पोस्ट प्रॉडक्शनवरही काम झाले. लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये तंत्रज्ञदेखील काही स्वस्थ बसलेले नव्हते. मागील चार महिन्यांच्या कालावधीत जवळपास वीस ते पंचवीस फिल्मच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम झाल्याचे विविध सूत्रांकडून समजते. काही प्रॉडक्शनच्या प्रसिद्धी माध्यमांशी असलेल्या समन्वयामुळे अनेक बाबी चटकन बाहेर येत होत्या.

ओटीटीवर गेले चित्रपट
प्रदर्शनासाठी डिजिटल –ओटीटी पर्यायाचा विचार झाल्याने यावर काही फिल्मची विक्रीही झाली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार जवळपास बत्तीस चित्रपटांची डिजिटलवर अंतिम किमतीसाठी चर्चा झाली होती. त्यातून किमान बावीस ते पंचवीस चित्रपटांची अंतिम स्वरुपात बोलणी झाल्याचे समजते. काहींचे ठरलेल्या रकमेचे सौदेही सर्वाना समजले.

लेखकांनी केले नव्या कथांवर काम
नवनवीन लेखकांना निर्मात्यांनी अनेक कल्पना सांगितल्या आणि त्या कल्पनेवर काम करण्यास सांगितले. लेखकांनी हा वेळ खूपच सार्थकी लावला आहे. काही परदेशी चित्रपटाच्या रशेस त्यांनी पाहिल्या व त्याचा अभ्यास केला तसेच सिक्वेल चित्रपटांची मालिका पुढे सुरू ठेवण्यासाठी नव्या कल्पना मांडल्या. तसेच चित्रपटांची नवनवीन नावे आणि स्क्रीप्टची आनलाईन नोंदणी करण्यात आली.

---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com