
Advance Booking मध्ये ब्रह्मास्त्रने मारली बाजी, रिलीज आधीच कमावले इतके कोटी
Brahmastra Advance Booking: रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र' थिएटरमध्ये रिलीज व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. दिग्दर्शक अयान मुखर्जीने २०१४ मध्ये या सिनेमाची जेव्हा घोषणा केली होती तेव्हा त्यानं या सिनेमाला एक फॅंटसी-अॅडव्हेंचर असल्याचं म्हटलं होतं. आता इतक्या वर्षानंतर लोक उत्सुक आहेत ही फॅंटसी अनुभवण्यास. आता सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला झालेली सुरुवात पाहून,त्याचे आकडे पाहून तरी वाटत आहे की प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.(Brahmastra biggest hindi release with 8000 screens takes flying in advance booking)
ब्रह्मास्त्र एक पॅन इंडिया सिनेमा आहे आणि हिंदी सोबत तेलुगु,कन्नड आणि मल्याळममध्ये देखील रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत मेकर्स सिनेमाला चांगलं ओपनिंग मिळण्यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. ब्रह्मास्त्रच्या अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहिले तर लक्षात येतंय की हा सिनेमा हिंदीतला सर्वात मोठा सिनेमा ठरेल. रीपोर्ट्समध्ये बोललं जात आहे की,करण जोहरच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनलेला हा सिनेमा जगभरात ८००० स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.
फक्त भारताविषयी बोलायचं झालं तर ब्रह्मास्त्र ५००० स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. हा आकडा अधिकृतरित्या कन्फर्म नसला तरी जर असं झालं तर हा हिंदीतला सगळ्यात मोठ्या स्तरावर रिलीज होणारा सिनेमा ठरेल. याआधी अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज जवळ-जवळ ४००० स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. बॉलीवूडच्या सिनेमांसाठी मोठ्या स्तरावर सिनेमा रिलीज म्हणजे भारतात ३५०० ते ४००० स्क्रीन्सवर तो रिलीज होणं.
ब्रह्मास्त्र बॉलीवूडचा सगळ्यात मोठ्या स्तरावर रिलीज होणारा सिनेमा ठरेलच,पण जागतिक स्तरावरही हा मोठ्या प्रमाणात रिलीज होणारा बॉलीवूडचा सिनेमा आहे. पण असं असलं तरी साऊथच्या बाहुबली, RRR, KGF2 यांच्या रिलीजच्या तुलनेत हा सिनेमा मागेच आहे.
ब्रह्मास्त्रची Advance बुकिंग २ सप्टेंबरला,शुक्रवारी सुरु झालं. सुरुवातीला काही ठराविक ठिकाणी Advance बुकिंग सुरू झालं होतं. पण शनिवारी ३ सप्टेंबर रोजी,अनेक ठिकाणी सिनेमाचं Advance बुकिंग सुरू झालं. सोशल मीडियावर गेल्या महिन्याभरापासून बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेन्ड सुरू झालं आहे. त्यामुळे मेकर्सला थोडी धाकधूक होती पण आता Advance बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा जीव भांड्यात पडला असणार हे निश्चित.
बातमी आहे की,एका सिनेमा चैनमध्ये ब्रह्मास्त्रचे १०,००० हून अधिक तिकीटं विकली गेली आहेत. आतापर्यंत म्हणे १.३० करोडहून अधिक Advance बुकिंगमधून कमाई झाली आहे.
२०२२ मध्ये Advance बुकिंगमधून सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा 'भूलभूलैय्या २' ठरला आहे. कार्तिक आर्यनच्या या हॉरर कॉमेडी सिनेमानंAdvance बुकिंगमधनं ६.५५ करोडची कमाई केली होती. ब्रह्मास्त्रला मिळणारा प्रतिसाद कायम राहिला तर, भूलभूलैय्या २ चा रेकॉर्ड सिनेमा तोडेल असं म्हटलं जात आहे.