अक्षयच्या 'कठपुतली'ला ओटीटीवरही मोठा झटका; टॉलीवूडनेच काढला काटा...Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cutputlli V/S Gumnaam hindi dubbed of rakshasudu releases the same day on ott askhay kumar film stream

अक्षयच्या 'कठपुतली'ला ओटीटीवरही मोठा झटका; टॉलीवूडनेच काढला काटा...

Akshay Kumar: अक्षय कुमारचा कठपुतली(Cutputlli) सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. एकापाठोपाठ एक असे तीन सिनेमे फ्लॉप झाल्यावर अक्षयनं रिस्क नको म्हणून आपला कठपुतली सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पण आता बोललं जात आहे की ओटीटीवर देखील अक्षयला मोठा झटका लागला आहे. अक्षयचा कठपुतली सिनेमा २०१८ मध्ये रिलीज झालेल्या तामिळ 'रत्सासन' सिनेमाचा रीमेक आहे. त्यानंतर याच सिनेमाचा २०१९ मध्ये तेलुगु मध्ये 'रक्षासुड्डु' नावानं रीमेक आला. शुक्रवारीच Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर साऊथवाल्यांनी तेलुगु 'रक्षासुड्डु' सिनेमाचा हिंदी व्हर्जन रिलीज केला. (Cutputlli V/S Gumnaam hindi dubbed of rakshasudu releases the same day on ott askhay kumar film stream)

हेही वाचा: अभिनेता संजय कपूरच्या पत्नीचा त्याच्या विवाहबाह्य संबंधांविषयी मोठा खुलासा

रक्षासुड्डुच्या या हिंदी व्हर्जनला गुमनाम नावानं रिलीज केलं गेलं. आता यामुळे कठपुतली पाहणारे प्रेक्षक विभागले जातील. म्हणजे अक्षयच्या कठपुतली सिनेमाला ओटीटीवरही प्रेक्षक मिळवताना हाजी-हाजी करावी लागतेय की काय असं चित्र निर्माण झालं आहे. तेलुगू सिनेमा रक्षासुड्डुचे दिग्दर्शक रमेश वर्मा आहेत. या सिनेमात मुख्य भूमिकेत बेल्लमकोंडा श्रीनिवास आणि अनुपमा परमेश्वरनं आहेत. अमित खाननं या सिनेमाला ओटीटीवर प्रदर्शित करण्याआधी पुन्हा एडिट केलं आहे.

हेही वाचा: 'आलिया_ MY_ Foot', ट्वीटरवर का होतंय ट्रेन्ड, समोर आलं नवीन कारण...

रक्षासुड्डु च्या हिंदी व्हर्जन असलेल्या गुमनाम सिनेमाला रिलीज करण्याविषयी Zee5 चे चीफ बिझनेस ऑफिसर मनिष कालरा म्हणताले की,''आम्हाला हा सायकॉलॉजिकल थ्रिलर रिलीज करताना खूप आनंद होत आहे. रक्षासुड्डुला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ओटीटीवरही तसाच प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे''.

हेही वाचा: सिद्धार्थ ते श्रीदेवी...निधनानंतर यांच्या प्रॉपर्टीचं काय झालं?

गुमनाम सिनेमाला पेन स्टुडियोजनं प्रेझेंट केलं आहे. सिनेमाचे निर्माते त्याच्या ओटीटी रिलीजविषयी म्हणाले की,''आता या सिनेमाला १९० देशातील प्रेक्षक पाहतील. सिनेमात रोमान्स आहेच पण बरेच ट्वीस्ट आहेत. अमित खान यांनी सायको-थ्रिलर सिनेमातील काही सीन्स रीशॉट करत जोडले आहेत,त्यामुळे सिनेमा अधिक रोमांचक झाला आहे''.

Web Title: Cutputlli Vs Gumnaam Hindi Dubbed Of Rakshasudu Releases The Same Day On Ott Askhay Kumar Film

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..