सुशांतच्या चाहत्यांना ट्रिट; 'दिल बेचारा'तील 'ते' गाणे झाले प्रदर्शित...

संतोष भिंगार्डे
Wednesday, 5 August 2020

हे गाणे चित्रपटाच्या आधी रिलीज झाले नव्हते. पण आता चित्रपटाच्या रिलीजनंतर या गाण्यांचे खूप कौतुक झाले आहे आणि प्रेक्षकांच्या विनंतीनुसार हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' हा ओटीटीवरील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला. अमिताभ भट्टाचार्य यांनी 'दिल बेचारा' या चित्रपटाची गीते लिहिली, तर ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. मुकेश छाबरा दिग्दर्शित या चित्रपटाच्या संगीताने अगोदरच लोकप्रियता मिळविली होती आणि आता त्यातील एक गाणे खास लोकग्रहास्तव प्रदर्शित करण्यात आले आहे. 'मसखरी' असे ते गाणे आहे.  

BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

या चित्रपटाच्या संगीतावर अफाट प्रेम सुशांतच्या चाहत्यांनी केले आहे आणि करत आहेत. आता त्यांच्या विनंतीवरून सोनी म्युझिक इंडियाने या चित्रपटाचे 'मसखरी' हे गाणे प्रदर्शित केले. हे गाणे सुनिधी चौहान आणि हृदय गट्टानी यांनी गायले आहे. आनंदी आणि विनोदी असलेले हे गाणे आयुष्यातील सर्व समस्या सोडवण्याचा संदेश देते. हे गाणे चित्रपटाच्या आधी रिलीज झाले नव्हते. पण आता चित्रपटाच्या रिलीजनंतर या गाण्यांचे खूप कौतुक झाले आहे आणि प्रेक्षकांच्या विनंतीनुसार हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

महाड शहरात पूरस्थिती; सावित्री नदीच्या पुराचं पाणी शहरात, नागरिकांमध्ये घबराट

सुनिधी चौहान या गाण्याबद्दल बोलताना म्हणाली, “मसखरी हे एक अतिशय मजेशीर गाणे आहे ज्याचे अनेक मनोरंजक भाग आहेत.  ए.आर. रेहमान सर यांचे गाणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणे आणखी मनोरंजक बनवून अप्रतिम पद्धतीने शब्दात मांडले आहे. आता हे गाणे प्रदर्शित झाल्याने मी खूप उत्सुक आहे."

सामनाच्या फ्रंट पेजवरील सूचक जाहिरात म्हणतेय, "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !"

गायक हृदय गट्टानी म्हणाला की, "सुनिधीबरोबर हे गाणे गाणे हा एक अद्भुत अनुभव होता. हे एक अतिशय रोमांचक गाणे आहे आणि या गाण्यासाठी अमिताभ भट्टाचार्य यांचे शब्द खूप रंजक आहेत. आज हे गाणे रिलीज झाले याचा मला खूप आनंद आहे आणि मी प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे."

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

मुकेश छाबरा दिग्दर्शित 'दिल बेचारा' या चित्रपटात सुशांतसिंग राजपूत आणि संजना सांघी मुख्य भूमिकेत आहेत. 24 जुलैला डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम नोंदवले. सोनी म्युझिक इंडिया निर्मित आणि ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटाच्या गाण्यांचा संपूर्ण अल्बम आता प्रेक्षकांसामोर आला आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dil becharas unrelease song released todaay, treat for sushants fan...