याद है ना २ अक्टूबर को क्या हुआ था? 'दृश्यम २' येतोय..

drishyam 2
drishyam 2

हिंदी चित्रपटांना रिमेकचं विशेष आकर्षण असल्याचं पाहायला मिळतं. त्यातही खासकरून दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटांचे हिंदी रिमेक सर्वाधिक असतात. 'दृश्यम' या नावाचा मल्याळम भाषेतील चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजल्यानंतर त्याचा हिंदी रिमेक दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केला होता. या हिंदी रिमेकलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता त्याचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

जितू जोसेफ दिग्दर्शित मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेला मल्याळम भाषेतील 'दृश्यम २' १९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. पहिला भाग ज्या ठिकाणी संपतो, त्याच्या सहा वर्षांनंतरची कथा या दुसऱ्या भागात दाखवण्यात आली आहे. तीच कथा हिंदीत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने पुन्हा एकदा अजय देवगण व तब्बू एकत्र काम करणार आहेत. "अजय आणि तब्बू मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. मल्याळम चित्रपटाचे कॉपी राइट्स विकत घेण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे", अशी माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे. 

'दृश्यम' हा हिंदी चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या वर्षाच्या मध्यापर्यंत शूटिंग सुरू झाल्यास २०२२ च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीवर जेव्हा संकट येतं, तेव्हा तिला आणि संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यासाठी एक पिता काय करू शकतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com