हास्याची मेजवानी आणि राजकीय धुरळा.. हास्यजत्रेत एकनाथ शिंदे.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde in maharashtrachi hasyajatra show on sony marathi

हास्याची मेजवानी आणि राजकीय धुरळा.. हास्यजत्रेत एकनाथ शिंदे..

गेल्या काही वर्षात सोनी मराठी sony marathi वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवलं. या मालिकेने विनोदाची आणि यशाची मोठी उंची गाठली आहे. सध्या दार आठवड्यात या मालिकेत अनेक पाहून भेट देत असतात. कधी नाटक तर कधी चित्रपटातील मंडळी हास्यजत्रेत सहभागी होतात. यंदा चक्क एक राजकीय व्यक्तिमत्व हास्यजत्रेत सहभागी झालं आहे.

हेही वाचा: 'चितळेंची फक्त बाकरवाडी, केतकी तर..' राष्ट्रवादीच्या या नेत्याची गंभीर टीका

यंदाच्या आठवड्यात म्हणजेच १६ आणि १७ मे रोजी रसिकांचं मनोरंजन अधिकच वाढणार आहे. कारण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) येणार आहेत. अनेक सभांमधून, भाषणांतून जनतेची मनं जिंकणारे एकनाथजी निखळ मनोरंजनाचा खास आस्वाद घ्यायला येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदेसुद्धा हास्यजत्रेत सहभागी होणार आहे.

हेही वाचा: 'विखारी आकसापोटी गरळ ओकण्याआधी..' अमोल कोल्हे यांचा केतकी चितळेला सल्ला

अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) 'धर्मवीर' (dharmveer) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने दोन कोटींचा गल्ला केला आहे. (dharmveer cross 2 crore box office collection at first day ) लेखक प्रवीण तरडे यांच्या लिखाणाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका जुन्या आणि लोकप्रिय राजकीय नेत्याची कारकिर्द सांगणार आहे. या निमित्ताने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लेखक, दिग्दर्शक, निर्माता प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई, क्षितीश दाते आणि अभिनेत्री श्रुती मराठे हे कलाकार हास्याच्या मंचावर येणार आहेत. यावेळी हास्यरथी देखील दर्जेदार स्किट सादर करणार आहेत. त्यामुळे हि हास्य मैफल पर्वणी ठरणार आहे.

Web Title: Eknath Shinde In Maharashtrachi Hasyajatra Show On Sony Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top