अखेर ठरलं; मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल होणार 'या' महिन्यात...

film festival
film festival

मुंबई : कोरोनामुळे सगळेच जग स्तब्ध झाले आहे. अख्खी चित्रपटसृष्टी जागच्या जागी ठप्प झाली आहे. चित्रपटांचे प्रदर्शन तसेच चित्रपट महोत्सवांचे आयोजन अशा कित्येक बाबी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पार पडत असे. मागील वर्षी या महोत्सवाने आपला दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्याचे मोठे सेलिब्रेशन करण्यात आले. 

त्यावेळी मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरूख खानला शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. मात्र यावर्षी कोरोनामुळे हा चित्रपट महोत्सव ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर असा एका आठवड्याचा हा महोत्सव असेल. या महोत्सवात लघुपट स्पर्धा आणि लोकप्रिय नृत्य स्पर्धा कायम ठेवली आहे. तसेच या महोत्सवात राजू हिरानी, राणी मुखर्जी, करण जोहर, रीमा दास, जोया अख्तर, ओनिर, विजय सेठूपती, कबीर खान आणि इतर बर्‍याच कलाकारांसह आणि प्रख्यात चित्रपट निर्मात्यांसह एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही असेच आयोजन करण्यात येणार आहे.

आयएफएफएम फेस्टिव्हलचे दिग्दर्शक मितू भौमिक लांगे म्हणाले,  “या अभूतपूर्व काळात चित्रपट प्रेमींची घरबसल्या करमणूक करणे आणि त्यांना शिक्षित करणे यासाठी हा एक अनोखा मार्ग आहे. आपल्याकडे आधीपासूनच भारताच्या वेगवेगळ्या भागातील चित्रपट निर्माते आहेत.  प्राख्यात चित्रपट पत्रकार राजीव मसंद हे चित्रपट आणि निर्मात्यांना त्यांच्या चाहत्यांच्या प्रश्नांच्या जगात घेऊन जात असताना अधिवेशनाचे संयोजन करतील."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com