RRR Movie: आता ठरलं! 25 मार्चला 'RRR' चित्रपटगृहात| Finally RRR Movie Released date announced by makers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Movie
RRR Movie: आता ठरलं! 25 मार्चला 'RRR' चित्रपटगृहात

RRR Movie: आता ठरलं! 25 मार्चला 'RRR' चित्रपटगृहात

RRR Movie: देशात वाढणाऱ्या कोरोनाचा परिणाम मनोरंजन (Entertainment) क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये अनेक बिग बजेट चित्रपटाच्या निर्मात्यांना आपले चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले आहे. याचा मोठा फटका आरआरआरला (RRR Movie) बसला आहे. दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहे. जानेवारीच्या 7 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या निर्बंधाचा फटका आरआरआरला बसल्याचे दिसून आले. त्यानंतर निर्मात्यांनी पुन्हा वेगळ्या तारखेची घोषणा केली होती. यासगळ्यात प्रेक्षकांची निराशा होत असल्याचेही निर्मात्यांच्या लक्षात आले.

आरआरआरच्या निर्मात्यांनी अखेर येत्या 25 मार्चला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. एस एस राजामौली (SS Rajamauli) दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रामचरण, ज्युनिअर एनटीआर तसेच अजय देवगण, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरआरआरच्या गाण्यांना, ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. सध्या सोशल मीडियावर तर नाटो नाटो या गाण्याचे मीम्स आणि रिल्स व्हायरल झाल्याचे दिसून येईल. त्यावरुन या गाण्याची लोकप्रियताही लक्षात येईल. बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर राजामौली यांनी आरआरआरच्या निर्मितीचा ध्यास घेतला. जवळपास अडीच वर्षांहून अधिक काळ या चित्रपटाची निर्मिती सुरु आहे. कोरोनाचा मोठा फटका आरआरआरला बसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Video: निवडणूक आयोगाची आज महत्वाची बैठक

ज्युनि. एनटीआर आणि रामचरण यांचा आरआरआर हा चित्रपट 25 मार्चला थिएटरमध्ये पाहता येणार आहे. तो वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या रिलिज डेटविषयी निर्मात्यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी फायनल डेट 25 मार्च असं लिहिलं आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. निर्मात्यांच्या दृष्टीनं त्यांना या चित्रपटाकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी तारखा बदलून परिस्थिती नियंत्रणात येण्याची प्रतिक्षा केली आहे.

हेही वाचा: Video Viral: 'बुरखा' घालून नोराच्या गाण्यावर 'मायलेकींचा' डान्स

Web Title: Finally Rrr Movie Released Date Announced By Makers Social Media 25 March

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top