जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' 12 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला...

संतोष भिंगार्डे
Thursday, 16 July 2020

पहिल्या फोटोत जान्हवी सैन्याच्या गणवेशात अभिमानाने उभी असल्याचे दिसते, दुसऱ्या फोटोत तिचे ऑनस्क्रीन वडील पंकज यांना मिठी मारताना दिसते आणि तिसऱ्या फोटोत अंगद बेदी हा सैन्याच्या गणवेशात दिसतो.

मुंबई : जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल'  या चित्रपटाचा प्रीमियर 12 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे. जानव्ही कपूरने सोशल मीडियावर रिलीजच्या तारखेसह या चित्रपटातील अन्य कलाकार अंगद बेदी आणि पंकज त्रिपाठी यांचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. 

मुंबईचे एक पाऊल पुढे; गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात 'अशी' झाली वाढ...

हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “भारताच्या पहिल्या महिला हवाई दलाच्या अधिकाऱ्याची कहाणी तुमच्यासमोर आणण्याचा अभिमान वाटतो. मला आशा आहे की ही कहाणी माझ्याप्रमाणेच तुम्हालाही एक प्रेरणा देईल.  गुंजन सक्सेना - कारगिल गर्ल 12 ऑगस्टला नेटफ्लिक्सवरून आपल्या भेटीला येत आहे!”   

शुल्कासाठी खारघरमधील शाळेचा असाही प्रताप; ऑनलाईन शिक्षणच केले बंद...

पहिल्या फोटोत जान्हवी सैन्याच्या गणवेशात अभिमानाने उभी असल्याचे दिसते, दुसऱ्या फोटोत तिचे ऑनस्क्रीन वडील पंकज यांना मिठी मारताना दिसते आणि तिसऱ्या फोटोत अंगद बेदी हा सैन्याच्या गणवेशात दिसतो. शरण शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात विनीत कुमार, मानव विज आणि आयशा रझा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 

राज्यातील कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती; 10 लाख लोकसंख्येमागे होतात केवळ 'इतक्या' चाचण्या...

या चित्रपटाबाबत बोलताना शरण शर्मा म्हणाले, “ही कथा देशभक्तीची कथा आहे त्यामुळे चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाला असे वाटते की 15 ऑगस्ट ही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सर्वोत्कृष्ट तारीख आहे.  
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gunjan saksena the kargil girl movie will release on netflix on 12 august