
Russia Ukraine War: रशियाच्या रॉकेटनं घेतला अभिनेत्रीचा बळी
Hollywood News: रशिया आणि युक्रेनमध्ये अजुनही युद्ध सुरुच आहे. गेल्या दोन (Russia ukraine war) आठवड्यांपासून सुरु असलेल्या या युद्धानं जगातल्या अनेक देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. रशियाला काही करुन युक्रेनचा ताबा हवा (Russia News) आहे. आता तर युक्रेननं नाटोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णयही घेतल्याचे कळते आहे. मात्र रशियानं आक्रमण काही थांबवलेले नाही. या युद्धामध्ये युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्याचे भयानक परिणाम झाले आहेत. हॉलीवूड, बॉलीवूडमधील (Bollywood News) कित्येक कलाकारांनी यावेळी रशियाचा निषेध केला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये एका अभिनेत्रीचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे युक्रेनमधील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
युक्रेनची अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा किवमध्ये मृत्यु झाला आहे. 67 वर्षीय या अभिनेत्रीच्या मृत्युनं युक्रेनमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रशियानं केलेल्या रॉकेट हल्ल्यात या अभिनेत्रीचा मृत्यु झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून युक्रेनमधील थिएटर कम्युनिटीच्या कलाकारांनी सोशल मीडियाचा आधार घेत रशियाचा धिक्कार केला आहे. त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे. हे सगळं जे घडत आहे त्याला कोण जबाबदार असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला आहे. यापूर्वी रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले होते.
यंग कम्युनिटीनं शेलक्या शब्दांत रशियाचे वाभाडे काढले आहेत. आता आमच्या देशात तुम्हाला कधीच माफ केले जाणार नाही. तुम्ही जी चुक केली आहे त्या चुकीला माफी नाहीच. तुम्ही केलेल्या हल्ल्यात आमच्या देशातील प्रतिभावान अभिनेत्रीचा मृत्यु झाला आहे. याला कोण जबाबदार असा प्रश्न यावेळी कलाकारांनी रशियन सरकारला विचारला आहे. ओक्साना श्वेत्स यांना युक्रेनच्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. युक्रेनच्या मनोरंजन विश्वात त्यांची मोठी ओळख होती.