करण मेहरा-निशा रावल घटस्फोटाची केस टी.व्हीवर Live? चर्चेला उधाण... Nisha Rawal-Karan Mehra Divorce Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan mehra And Nisha Rawal divorce should be live on Tv,fans demand. designer rohit verma revealed big secret about nisha and karan marriage.

करण मेहरा-निशा रावल घटस्फोटाची केस टी.व्हीवर Live? चर्चेला उधाण...

Karan Mehra_Nisha Rawal Divorce Case: टी.व्ही अभिनेत्री निशा रावल(Nisha Rawal) आणि तिचा पती अभिनेता करण मेहरा(karan Mehra) यांच्या आयुष्यात सध्या मोठं वादळ सुरु आहे. दोघंही घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. दोघांमधील बिघडलेल्या नात्याविषयी अनेक उलट-सुलट बातम्या कानावर पडत आहेत. दोघं गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच करण मेहराने एक पत्रकार परिषद घेऊन त्यात निशा रावलविषयी मोठं विधान केलं होतं. त्यानं खुलासा केला होता की तिचं अभिनेता रोहित सतियासोबत अफेअर सुरू आहे.(Karan mehra And Nisha Rawal divorce should be live on Tv,fans demand. designer rohit verma revealed big secret about nisha and karan marriage.)

हेही वाचा: लाल सिंग चड्ढामुळे विजय देवरकोंडाही अडचणीत; Boycott Liger म्हणू लागले लोक..

करणने खुलासा केल्यानंतर अभिनेत्री कश्मिरा शहानं देखील समोर करणच्या समर्थनार्थ आपलं मत मांडलं होतं. तिनं म्हटलं होतं की, ''करण खूप साधा आहे. करणने रोहित वर्माविरोधात मानहानीची केस दाखल केली आहे. रोहित वर्मा हा निशाला पाठिंबा देत होता''. आता यावर डिझाइनर रोहित वर्मानं मोठा खुलासा करत म्हटलं आहे की, ''मीच ८ वर्षांपूर्वी निशा आणि करणच्या नात्याला तुटण्यापासून वाचवलं आहे''.

हेही वाचा: भारतीय रेल्वेची करिनानं उडवली खिल्ली, ऐकून भडकले लोक; म्हणाले,'ही किती...'

एका मुलाखतीत रोहित वर्मा म्हणाला आहे की,''२०१४ मध्ये निशा आणि करणच्या नात्यात तणाव सुरू झाला. मीच त्यांचं लग्न वाचवलं होतं. करणला समजावलं होतं की तु कुठे चुकत आहे. निशा एक अशी व्यक्ती आहे जिला फक्त प्रेम हवं आहे. तिनं कुटुंबातील ताण-तणाव, विभक्तपणा सहन केला आहे. तिच्या आई-वडीलांचं तुटलेलं नातं तिनं अनुभवलं आहे. तिच्या आईनं खुप कष्टानं तिला मोठं केलंय. तिला वडीलांचे प्रेम कधीच मिळाले नाही''.

हेही वाचा: '1 करोड भरा नाहीतर...'; रणबीरच्या शमशेराला ओटीटी रिलीजसाठी हायकोर्टाचा दणका

रोहित पुढे म्हणाला की,'' निशाचे सगळे पूर्वाश्रमीचे बॉयफ्रेंड तिच्यावर खूप प्रेम करायचे. मी तिचा प्रवास जवळून पाहिला आहे. ती खूप समजूतदार मुलगी आहे आणि तिच्या जीभेवर सरस्वती वास करते. ती कोणालाही पटकन मनवू शकते. ती तिची खासियत आहे. ती इतकीही वाईट नाही जितकं तिला दाखवलं जात आहे. जर मी माझ्या मैत्रिणीचा पाठिंबा देतोय तर मी वाईट का?''

हेही वाचा: Laal Singh Chaddha: 9 व्या दिवशी आमिरने गमावले १०० करोड,मग कमावले किती?वाचा

रोहित वर्माची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की,'करण आणि निशाची घटस्फोटाची केस टी.व्हीवर दाखवायला हवी. जसं हॉलीवूडच्या जॉनी डेप आणि एम्बर हर्डची केस टीव्ही वर दाखवलेली अगदी तशीच'. तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे,'मला वाटतं करणची घटस्फोटाची केस टी.व्ही वर लाईव्ह दाखवायला हवी. मला माहित आहे करण निशाच्या विरोधात जिंकेल'. तर दुसरा एक नेटकरी म्हणाला,'बरं झालं करणने या रोहित वर्माच्या विरोधात मानहानीची केस ठोकली. याची हिच लायकी आहे'.

हेही वाचा: KBC 14: हॉट सीटवरच यशस्वीला कोसळलं रडू, पुढे जे घडलं ते फक्त अमिताभच करू शकतात

आणखी एक नेटकरी रोहित वर्माच्या त्या व्हिडीओवर म्हणाला,'आपल्या डोळ्यांनी काही पाहिलं नाही. जी कहाणी एम्बर हर्डने ऐकवली तिच ऐकून करण मेहराची इमेज मीडियासमोर खराब करत आहे. आणि आता स्वतः तक्रार करत फिरतोय,करण याच्यावर रागावलाय म्हणून. याला काय वाटलं,हा काहीही बोलल आणि करणचं आयुष्य खराब करून टाकेल'.