esakal | Video : 'कोरोना स्टॉप करोना'; कार्तिक आर्यनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

बोलून बातमी शोधा

kartik-Aryan

दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या 'भूल भूलैय्या २' मध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत असणार आहे. 'कबीर सिंग' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तब्बू या दोघी वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत.

Video : 'कोरोना स्टॉप करोना'; कार्तिक आर्यनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्वच देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच कोरोनाला साथीचा रोग म्हणून जाहीर करत आपापल्या परीने खबरदारी घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरात ९ हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर भारतात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून १७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी १५ जण पूर्णत: बरे झाले आहेत. 

- Coronavirus: इटलीत कोरोनाचे बळी वाढण्याचे कारणच वेगळे; मृतांची टक्केवारी चिंताजनक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.१९) सर्व देशवासियांशी संवाद साधत कोरोनाला आळा घालण्यासाठी जनता कर्फ्यूची घोषणा केली. आणि येत्या रविवारी (ता.२२) सर्व भारतीयांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची दखल घेत आता बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या फॅन फॉलोअर्स आणि चाहत्यांना आपापल्या परीने आवाहन केले आहे.

- आठ वर्षापासून बारावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात "कोरोना'... तरी नवीन कसा!

बॉलिवूडच्या तरुण फळीतील कलाकार अभिनेता कार्तिक आर्यनने पंतप्रधानांच्या या आवाहनाचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. या संबंधीचा एक व्हिडिओ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला असून यावर नेटकऱ्यांनी उड्या घेतल्या आहेत. कार्तिक आर्यन हा एकपात्री कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेच. आताही त्याने पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर एक एकपात्री सादर केली असून तो कोरोनाला घालवण्यासाठी सर्व भारतीयांना आवाहन करत आहे. 

#CoronaStopKaroNa या आजारावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. मात्र, त्याचा संसर्ग होण्यापासून सावधगिरी बाळगू शकतो. त्यासाठी सर्वांनी सुरक्षिततेचे उपाय अवलंबणे गरजेचे आहे. असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. काही वेळातच हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून याची तुफान चर्चाही होत आहे. 

- संशोधक म्हणतात, 'कोरोना व्हायरस हा नैसर्गिकच!'

कार्तिकच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे आणि कोरोनामुळे शूटिंगही बंद असल्याने तो घरीच सुट्टी एन्जॉय करत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या 'भूल भूलैय्या २' मध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत असणार आहे. 'कबीर सिंग' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तब्बू या दोघी वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत.

- Coronavirus : कोरोनाची लस शोधण्यात संशोधकांना यश; चाचणीत दिसले सकारात्मक परिणाम!