Laal Singh Chaddha: आमिरपेक्षा 17 वर्षांनी लहान असलेली 'जस्सी' फेम मोना आईच्या भूमिकेत

जस्सी जैसी कोई नही म्हणत घराघरात पोहचलेली मोना सिंग आता अमिरचा चित्रपट लाल सिंह चड्ढा मध्ये दिसणार आहे.
Aamir Khan
Aamir Khanesakal

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आयपीएलच्या सांगत कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केल्याने या चित्रपटाची जगभर चर्चा रंगली आहे. बॉलीवूडच्या जगात या ट्रेलरसह चित्रपटामध्ये अमिरच्या आईची भूमिका बजावलेली मोना सिंह सध्या चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे अमिर खान तिच्यापेक्षा १७ वर्षांनी मोठा आहे.

अमिरपेक्षा १७ वर्षांनी मोठी

जस्सी जैसी कोई नही म्हणत घराघरात पोहचलेली मोना सिंग आता अमिरचा चित्रपट लाल सिंह चड्ढा मध्ये दिसणार आहे. आमिर खान आणि मोना सिंह यांच्या वयात खुप मोठी तफावत आहे. मोना सिंही ही ४० वर्षाची आहे तर अमिर खान ५७ वर्षाचा आहे.

लाल सिंह चड्ढा मध्ये मोना सिंग आईची भूमिका साकारणार आहे. सध्या तिच्या कराकिर्दीची सर्वत्र चर्चा होत आहे. मोना सिंगने तिच्या पात्राशी पूर्णपणे जुळवून घेतल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते. 'लाल सिंग चड्ढा' रिलीज झाल्यानंतर मोना सिंगचे उत्तम काम मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Aamir Khan
IPL 2022 Final: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर रिलीज

मोना सिंहचा जन्म ८ ऑक्टोबरला झाला. ती चंदीगढमधील शीख कुटूंबातील आहे. मोनाने, जस्सी जैसी कोई नही, राधा की बेडियां कुछ कर दिखाएंगी, क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो, कवचः काली शक्तियों से, कहने को हमसफर है, ये मेरी फॅमिली अशा अनेक प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

मोठ्या पडद्यावरही नाव आजमावलं

छोट्या पडद्यासह मोनाने मोठ्या पडद्यावरही नाव आजमावलं आहे. २००९ मध्ये ३ इडियट्स या चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्याकडे वळली. अमिर खान आणि करीना कपूर खानच्या या चित्रपटामध्ये मोना करीनाच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसली.

यानंतर ती उड पटांग, झेड प्लस, आणि अमावस या चित्रपटांमध्येही दिसली. आता मोना पुन्हा एकदा आमिर आणि करीनाच्या आगामी लाल सिंग चड्ढ या चित्रपटात झळकणार आहे.

Aamir Khan
Main Ki Karan: आमीर खानच्या 'लाला सिंग चड्ढा' चित्रपटाचं नवं गाणं ऐकलंत काय ?

वयाच्या ३८ व्या वर्षी बांधली लग्नगाठ

मोना सिंहने वयाच्या ३८ व्या वर्षी लग्नगाठ बांधली. तिनं २७ डिसेंबर २०१९ रोजी शीख रितीरिवाजानुसार दक्षिण भारतीय बँकर श्याम राजगोपालनशी लग्न केलं.

आमिर आणि करिनासोबतच लाला सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये मोना सिंह, नागा चैतन्य हे देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com