आषाढी एकादशी निमित्त लतादीदींनी केले संत ज्ञानेश्वरांच्या "मोगरा फुलला" या अभंगाचे निरूपण...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 जुलै 2020

गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी यांनी पूर्वी गायलेल्या "मोगरा फुलला" या अभंगाचे निरूपण आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने  घेऊन आल्या. हा मूळ अभंग संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी  हा अभंग संगीतबद्ध केला आहे.

मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी यांनी पूर्वी गायलेल्या "मोगरा फुलला" या अभंगाचे निरूपण आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने  घेऊन आल्या. हा मूळ अभंग संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी  हा अभंग संगीतबद्ध केला आहे. त्याच अभंगाचे निरुपण लतादीदींनी आज केले.

ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

संगीतकार मयूरेश पै यांनी सांगितले, की लतादीदींना भेटण्यासाठी प्रभकुंज येथे 23 जून रोजी गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि आमच्या गप्पा सुरू होत्या. तेथे पंडित हृदयनाथ मंगेशकर आले. त्यांनी आषाढी वारीचा विषय काढला. ते दीदींना म्हणाले की," दीदी या वर्षी आषाढी वारीला लोकांना, वारकऱ्यांना जाणं शक्य होणार नाही. तेव्हा या आषाढी वारीच्या निमित्तानं विठोबारायाची सेवा म्हणून या तमाम वारकरी भक्तांना तू काही तरी भेट द्यावीस. 

खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

त्यासाठी ज्ञानोबारायांच्या  'मोगरा फुलला' या अभंगाचं तू निरूपण करावंस." आणि मला ते म्हणाले, ' मयुरेश तुम्ही आता आलाच आहात तर दीदींच्या निरूपणाचं रेकॉर्डिंग करून घ्या.' मग काय, आपल्याला आणखी काय हवं असतं, दीदींची अशी अमृतवाणी ऐकणे यापेक्षा भाग्य ते कोणतं ? त्यांच्या या गाण्यासाठी मग रेकॉर्डिंग सुरू केलं. साक्षात ईश्वरीय स्वरांचं रूप असलेलं लतादीदींसारखं व्यक्तिमत्त्व आपल्या वाणीनं या अक्षय अभंगाचं निरूपण करीत होतं. 

मुंबईकरांनो सावधान! जुलै महिन्यातील आठ दिवस धोक्याचे; प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा..

विभुतीरूप संतांच्या कवनाच्या शब्दांचा आणि सुरांचा परिमळ काय असतो हे लतादीदी उलगडून सांगत होत्या. त्या अभंगाच्या प्राजक्ताच्या पाकळ्या त्या आपल्या शब्दांनी फुलवत होत्या. या कवनाचा मोगरा हळूहळू फुलत होता, दरवळत होता. मी, उषाताई, आणि हृदयनाथजी त्या परिमळाचा अनुभव घेत होतो. हे आमचं मोठं भाग्यच होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lata Mangeshkar reads saint dnyaneshwar maharaj abhang mogara fulala...