बॉलीवूडच्या पडद्यामागील 'तो' काळाकुट्ट अंधारच ठरतोय घातक... 

bollywood
bollywood

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील कंपूशाहीबद्दल काल अभिनेत्री कंगना रानौतने तोंड उघडले. तिचा व्हिडीओ मोठ्या व्हायरल झाला. ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही आपल्या ट्विटमधून अप्रत्यक्षरित्या याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यामुळे आज काही कलाकारांनी याबाबत आपली मते सोशल मीडियावर व्यक्त केली. एकंदरीत हिंदी चित्रपटसृष्टीत आऊटसायर्डना डावलेले जाते. या मुद्द्यावरून आता रान उठले आहे, हिंदी चित्रपटसृष्टीतील झगमगटामध्ये किती अंधार दाटलेला आहे याची प्रचीती यावरून येते.

अभिनेता रणवीर शौरीने सुशांतबरोबर सोनचिडीया या चित्रपटात काम केले आहे. तो म्हणतो की जेव्हा सुशांतला बॉलीवूडची आवश्यकता होती, तेव्हा त्याला साथ भेटली नाही. आमची सोनचिडिया हा चित्रपट चालला नाही. पण सुशांत आत्माविश्वास चांगला होता. जेव्हा तुम्ही एका उंचीवर पोहोचतात. तेव्हा बॉलीवूडमधील लोक फार निर्दयी आणि क्रूर होतात. आपल्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोकळ्या आणि लोकशाही वातावरणाची गरज आहे. बॉलीवूड ही आपलीच संपत्ती आहे, अशा मंडळींवर त्याने निशाणा साधला आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयने सोशल मीडियावर आपले मत मांडताना म्हटले आहे, की सुशांतने माझे दुःख ऐकले असते तर नक्कीच त्याचे दुःख कमी झाले असते. मी देखील अशा काही गोष्टींचा सामना करावा लागला आहे. आपली इंडस्ट्री स्वतःला एक कुटुंब आहे असे मानते. मग आता तरी इंडस्ट्रीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विवेकचा रोखही तोच होता, असे समजते.

बबिता फोगट ही भारतीय कुस्तीपटू आहे. तिने कंगनाच्या बोलण्यास दुजोरा व समर्थन दिले असून तिने घराणेशाहीचा आरोप बॉलीवूडवर केला आहे. येथे खेड्यातून आलेल्या लोकांना चांगली वागणूक भेटत नाही. फिल्म इंडस्ट्री कोणाच्याही बापाची मालमत्ता नाही, असेही बबिता म्हणते . बबिताने थेट एका मोठ्या बॉलीवूडमधील मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले विचार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com