सिनेमाची शान मराठा मंदीर; सेक्स वर्कर्स,ट्रान्स जेंडर्सना देतं खास सुविधा Maratha Mandir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Mandir

सिनेमाची शान मराठा मंदीर; सेक्स वर्कर्स,ट्रान्स जेंडर्सना देतं खास सुविधा

असं म्हणतात भारतात फक्त तीन गोष्टी विकल्या जातात त्या म्हणजे क्रिकेट(Cricket),क्राइम आणि सिनेमा(Movie). गेल्या काही वर्षात तर बॉलीवूडनं(Bollywood) लोकांना पुरत वेड लावून टाकलंय. लोकांच्या मनावर आजही काही सिनेमे राज्य करतात ज्यांना प्रदर्शित होऊन खूप वर्ष झाली आहेत. यातलाचा एक सिनेमा आहे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. हा सिनेमा १९९५ मध्ये प्रदर्शित झाला पण आजही तो अनेकांना पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो. या सिनेमाची आठवण आजही लोकांमध्ये कायम ठेवण्यात मोठा हात कुणाचा असेल तर मुंबईतील (Mumbai)आयकॉनिक थिएटर मराठा मंदीरचा. २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही मराठा मंदीर(Maratha Mandir)मध्ये दाखवला जातो. चला,जाणून घेऊया मराठा मंदीरच्या सुवर्ण इतिहासाला आणि काय कारण आहे असं मोठं की या थिएटरमध्ये आजही 'दिलवाले दुल्हनियां' सिनेमा दाखवला जातो.

हेही वाचा: हॉलीवूड अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप; म्हणाली,'तो माझ्या गुप्तांगात...'

मुंबईची ओळख आणि त्यावेळचं सर्वात शानदार असं मराठा मंदीर १६ ऑक्टोबर १९५८ रोजी लोकांसाठी खुलं केलं गेलं. त्यावेळी सिनेमागृहात एकूण १००० लोकं बसू शकत होते,जी खरंतर खूप मोठी संख्या होती. १९६० आणि ७० च्या दशकात बॉलीवूडचे मोठे सिनेमा मराठा मंदीरमध्ये दाखवले जायचे. असं मानलं जायचं की ज्या सिनेमाचा प्रीमियर मराठा मंदीरमध्ये होईल तो सिनेमा सुपरहिट होणारच. या थिएटरमध्ये प्रत्येक वर्गातील लोकं सिनेमा पाहण्यासाठी यायचे.कारण इथले तिकीटांचे दर फार कमी असायचे. एक वेळ होती की मराठा मंदीर हे तरुणांसाठी डेटिंग स्पॉट होतं. मराठा मंदीर मुंबईसाठी एक लॅंडमार्क होता. बरं,ज्या रस्त्यावर हे सिनेमागृह आहे त्या रस्त्यालाही मराठा मंदिर मार्ग असं नाव देण्यात आलं आहे.

हेही वाचा: हॉलिवूडचे डार्क सीक्रेट्स: कुणाला आंघोळीचा कंटाळा तर कुणाचे वडील होते चोर

मराठा मंदिर मध्ये शाहरुख आणि काजोलची मध्यवर्ती भूमिका असलेला 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे' हा सिनेमा २६ वर्षाहून अधिक काळ दाखवला जात आहे. हा एक खरंतर खूप मोठा रेकॉर्ड आहे. राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीला इतकी वर्ष का चालवंल गेलं असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? याचं उत्तर देताना एकदा मराठा मंदीरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मनोज देसाई म्हणाले,''सिनेमाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांत लगेचच हा सिनेमा खूप दिवस चालवायचा याचा आम्ही निर्णय घेतला होता. शाहरुख-काजोल फ्रेश जोडी होती,आदित्य चोप्रा हा नवीन उमदा दिग्दर्शक होता. आणि हे शक्य झालं कारण हा एक सुपरहिट सिनेमा होता. दुसरं म्हणजे याचं संगीत आजही पॉप्युलर आहे. सिनेमात काहीच नावाला काढायला सुद्धा खोट नव्हती. एक क्युट कपलची प्रेमकहाणी आहे. परदेश खूप छान दाखवण्यात आला होता. आणि म्हणूनच इतक्या सगळ्या कारणांमुळेच हा एक परफेक्ट सिनेमा होता''.

हेही वाचा: 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीचा Sex Video आईनंच केलेला Leak; 14 वर्षांनी खुलासा

१९९० साली सिनेमागृहांचे तिकीटाचे दर फारच कमी होते. पण मराठा मंदीरचे दर आणखी कमी असायचे. ते दर इतके कमी होते की आजच्या जमान्यात वेटरला टीप देखील लोकं यापेक्षा जास्त देत असतील. अगदी ८,१०,१२ असे दर तेव्हा असायचे. लोकं आरामात बाल्कनीत बसून सिनेमा एन्जॉय करायचे. आणि हेच कारण होतं इथे डेटिंग करणारे कपल्स यायचे. इथे येणाऱ्या अनेक कपल्सनी नंतर लग्न केल्याचं सांगताना मनोज देसाई म्हणाले,''अशा कितीतरी कपल्सना मी ओळखतो जे लग्नाआधी,लग्नानंतर,हनिमून नंतरही इथे सिनेमा पहायला आले आहेत. आजही सुट्टीच्या दिवशी लोकं DDLJ पहायला येतात,हे त्यांचं वेडच म्हणायचं नाही का. सुट्टीच्या दिवशी थिएटर जवळपास ७० टक्के फूल असतं''.

हेही वाचा: कार्तिक आर्यन आहे अंधविश्वासू; हॉटेल रुममध्ये एकटा असताना करतो अजब हरकत

असं कितीतरीवेळा होतं की DDLJ च्या पूर्ण शो मध्ये मराठा मंदीरपासून जवळच असलेल्या रेड लाइट एरिया कामाठीपुरातील सेक्स वर्कर्स येत असतात. यासंदर्भात बोलताना मनोज देसाई म्हणाले,''देहविक्री करणाऱ्या महिलांचं आयुष्य खूप कठीण असतं. रात्री त्या आपलं काम करतात आणि मग दिवसा स्वतःचं मनोरंजन करवून घेण्यासाठी इथे सिनेमा पहायला येतात. त्या बऱ्याचदा मला येऊन भेटतात,नमस्कार करून जातात. त्यामुळे आम्ही हा नियम बनवला आहे की सेक्स वर्कर्स आणि ट्रान्स जेंडर्सना कधीच तिकीटाच्या रांगेत उभं करायचं नाही''.

हेही वाचा: आलियाचा तब्बल 3 महिने रणबीरपासून लांब राहण्याचा निर्णय; कारणही सांगितलं

''मराठा मंदिर मध्ये अनेक वर्षांपासून DDLJ सुरु आहे. जोपर्यंत सिनेमाला प्रेक्षक मिळतोय तोपर्यंत मी हा सिनेमा थिएटरमध्ये चालवणार. एकदा आम्ही सिनेमा काढायचा निर्णय घेतला होता पण त्यावर लोक भडकले होते. ४०-५० लोकांचा समुह थिएटरच्या गेटजवळ आला आणि आम्हाला दटावू लागला. मग जर लोकांना सिनेमा पहायचा आहे तर मग आम्ही त्याला का हटवू. आता हा सिनेमा इथून हटेल तो फक्त पब्लिक डिमांडवर''.

Web Title: Mara Tha Mandir Provide Special Facilities For Sex Workers Transgender

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top