इफ्फीमध्ये 'गढूळ'ची ऐन्ट्री; स्मिता तांबेची चौथी फिल्म इफ्फीत!

Marathi-Actress-Smita-Tambe
Marathi-Actress-Smita-Tambe

सध्या सिनेरसिंकांना लवकरच गोव्यामध्ये सुरू होणा-या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)चे वेध लागलेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातल्या निवडक उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत. इफ्फीमधल्या 'इंडियन पॅनोरमा' सेक्शनमधल्या 'नॉन फिचर फिल्म' विभागात अभिनेत्री स्मिता तांबेच्या 'गढूळ' चित्रपटाची निवड झाली आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी स्मिता तांबेचा ऋणानुबंध तसा जुना आहे. स्मिताची ही चौथी कलाकृती आहे, जी इफ्फीमध्ये दाखवली जाणार आहे. याअगोदर धुसर, रूख, पांगिरा या सिनेमांचीही इफ्फीमध्ये वर्णी लागली होती.

इफ्फीविषयी स्मिता तांबे सांगते, "पहिल्यांदा मी इफ्फीमध्ये जेव्हा सहभागी झाले होते, तेव्हा या चित्रपट महोत्सवाच्या भव्यतेविषयी मला कल्पना नव्हती, पण लवकरच मला हा महोत्सव म्हणजे सिनेरसिकांची पंढरी असल्याचे जाणवले. जगभरातल्या फिल्ममेकर्स आणि कलावंताना भेटण्याची संधी या चित्रपट महोत्सवातून मिळते.''

त्या पुढे म्हणाल्या, ''भारतातल्या नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये प्रतिष्ठेचे मानले जाणारे इफ्फी असल्याने या चित्रपट महोत्सवात आपल्या सिनेमाचे सिलेक्शन होणे, ही एक कौतुकाची थाप असते. त्यामुळे 'गढूळ'चे सिलेक्शन होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com