MC Stan: 'अभी तु बडा हस्ती ब्रो!', एमसी स्टॅननं विराट कोहलीलाही टाकलं मागे..बनवला रेकॉर्ड

MC Stan
MC StanEsakal

बिग बॉस 16 चा अंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. तरी देखील सर्वत्र बिग बॉसच्याच चर्चा सुरु आहे. शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरीला मागे टाकत एमसी स्टॅननं ट्रॉफीवर त्याचं नावं कोरलं. सोशल मिडियावर केवळ शिव आणि प्रियंका यांच्या विजयाच्या चर्चा होत असतांना एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याला विजय मिळवून दिला. सर्वाधिक मते मिळवून MC बिग बॉस 16 चा विजेता ठरला.

MC Stan
Vivek Agnihotri On Pathaan: 'बॉयकॉट गँगमुळेच पठाण यशस्वी', विवेक अग्नीहोत्रीनं शाहरुखचं कौतुक केलं की...

स्टॅनच्या चाहत्यांची कमी नाही हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र या शोनंतरही त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा रियल स्वभाव चाहत्यांच्या मनात घर करुन गेले. आता त्याने लोकप्रियतेच्या बाबतीत विराट कोहली, सिद्धार्थ शुक्ला, तेजस्वी प्रकाश आणि इतर स्टार्संना देखील मागे टाकले आहे.

MC Stan
Shiv Thakare: 'दम हाय नावात वट हाय गावात'! शिव गावाला आला गावकऱ्यांना आनंद झाला..

Mc Stan च्या व्हिक्टरी पोस्टला सर्वाधिक लाइक्स मिळाले. या पोस्टमध्ये एमसीने सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटोला जवळपास 7 कोटी लोकांनी लाईक केले आहे. स्टॅनच्या या पोस्टला 6 कोटी, 9 लाख, 94 हजार 540 लोकांनी लाईक केले आहे. आणि अजूनही या पोस्टवर लाइक्सचा सातत्याने वर्षाव होत आहेत.

MC Stan
Manoj Bajpayee: बिहारमध्ये बनणार फिल्मसिटी? मनोज बाजपेयी म्हणाले, 'गेली 15-20 वर्षांपासून'

आता तर एमीसी स्टॅनच्या चाहत्यांनी विराट कोहलीसोबत त्याची पोस्टही शेअर केली आहे. लोकांनी सांगितले की, स्टॅनने लोकप्रियतेच्या बाबतीत विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे. चाहत्यांनी स्टॅनच्या पोस्टची विराट कोहलीच्या नवीन पोस्टशी तुलना केली. विराट कोहलीच्या पोस्टपेक्षा स्टॅनच्या पोस्टला दुप्पट लाइक्स मिळाल्याचं चाहत्याचं म्हणणं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com