Nagraj Manjule: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'झुंड' चा Teaser प्रदर्शित

गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती.
Jhund teaser
Jhund teaser

Jhund Trailer: मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड(Jhund) हा चित्रपट पुढील महिन्यात 4 तारखेला प्रदर्शित होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता त्याचा ट्रेलर (trailer) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मराठी अभिनेता, पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये लीलय़ा वावरणाऱ्या नागराजच्या झुंडच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहत होते. यापूर्वी त्याच्या टीझरनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. अजय अतुलचं (Ajay Atul) संगीत असणाऱ्या झुंडमध्ये एका फुटबॉल कोचची कथा सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. jhund trailer viral on social media

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटनं (Sairat) बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटांनं 110 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता त्याच्या या चित्रपटाकडून देखील मोठी अपेक्षा आहे. नागराज झुंडमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटामध्ये बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे.

Jhund teaser
Pushpaच्या 'उ अंतवा' गाण्यावर नवरा-नवरीचा जबरदस्त डान्स Viral!

कोरोनाच्या(Corona) संकटात या सिनेमाचं प्रदर्शन रखडलं होतं. पण पुढे लॉकडाऊन उठल्यानंतरही 'झुंड' कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे प्रदर्शन पुन्हा रखडलं. अर्थात आता सगळे अडथळे पार केल्यानंतर झुंडची प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. सिनेमागृहात 'झुं'ड भेटीला येतोय ही प्रेक्षकांसाठी मोठी गूड न्यूज आहे. हा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती. याच कथेवर आधारित हा सिनेमा आहे. हा एक स्पोर्ट ड्रामा आहे.

Jhund teaser
भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com