
तुम्हाला आठवत असेल मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण याचा नाकात नथ घातलेला एक फोटो सोशल मी़डियावर भलताच व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यानं हा लुक आपण आपल्या एका वेबसीरीजसाठी करत असल्याचे सांगितले होते. ती मालिका म्हणजे पौरुषपुर ही आहे. सध्या या मालिकेचा चांगलाच बोलबाला सुरु आहे.
मुंबई - तुम्हाला आठवत असेल मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण याचा नाकात नथ घातलेला एक फोटो सोशल मी़डियावर भलताच व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यानं हा लुक आपण आपल्या एका वेबसीरीजसाठी करत असल्याचे सांगितले होते. ती मालिका म्हणजे पौरुषपुर ही आहे. सध्या या मालिकेचा चांगलाच बोलबाला सुरु आहे. कथानक तसे फार काही वेगळं नाही. मात्र त्या मालिकेतील इंटिमेट सीनमुळे तिला प्रचंड संख्येने प्रेक्षकवर्ग लाभला आहे. याच मालिकेमधल्या अभिनेत्रीनं आपल्याला इंटिमेट सीन देताना कुठल्या दिव्याला सामोरं जावं लागलं याची माहिती दिली आहे. तिनं केलेला खुलासा धक्कादायक म्हणावा असा आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारतीय वेबमालिकांच्या दुनियेत परदेशी मालिकांच्या तुलनेत नाविन्य नसलं तरी त्यांचा जॉनर प्रामुख्यानं लव, सेक्स, क्राईम असा असल्याचा दिसून येईल. जवळपास ६० टक्क्यांहून अधिक मालिका या क्राईम आणि सेक्स संबंधित असल्याच्या दिसून येतील. त्यांना मिळणारा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. त्यामुळे अशा पध्दतीच्या मालिकांची निर्मितीही वाढते आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजत असलेली नवी मालिका म्हणजे पौरुषपूर. त्यात दाखविण्यात आलेले शृंगारिक प्रसंग कमालीचे लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे त्याच्या टीआरपीमध्येही वाढ झाली आहे.
एकता कपूर निर्मित पौरुषपूर या वेब सीरिजमध्ये अभिनेता मिलिंद सोमण, अनू कपूर, शिल्पा शिंदे, शहीर शेख, साहिल सलाथिया, पोलोमी दास, अनंतविजय जोशी, फ्लोरा सॅनी, अश्मिता बख्शी आणि आदित्य लाल या कलाकारांच्या भूमिका आहेत. या सीरिजमध्ये अनू कपूर यांनी राजा भद्रप्रताप सिंह यांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री अश्मिता बख्शीने राणी उमंगलता यांची भूमिका साकारली आहे. अश्मिताने अनू कपूर यांच्यासोबत लव्ह मेकिंग सीन दिला असल्याचे पाहायला मिळते. या सीनमध्ये अश्मिताच्या पाठीवर गरम मेण ओतले होते. त्याबाबतचा खुलासा तिनं केला आहे.
बापरे! एवढ्या कोटींमध्ये विकले गेले सलमान खानच्या 'राधे' सिनेमाचे हक्क
आपल्या या नव्या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना अश्मिता म्हणाली, ‘हा लव्ह मेकिंग सीन शूट करणे माझ्यासाठी कठिण होते. या सीनमध्ये माझ्या पाठीवर वितळलेले गरम मेण ओतण्यात आले होते. हे वितळलेले गरम मेण वापरण्यात आले होते. तेव्हा मी सिलिकॉनच्या शीट वापरले होते. त्यामुळे मला फार त्रास झाला नाही’ विशेष म्हणजे ‘पौरषपुर’ या वेब सीरिजच्या पहिल्याच भागात अश्मिताने असा सीन दिला आहे. या सीनबाबत तिने ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य केले.
'मला नशेबाज म्हणतायं, तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज'
अश्मितानं अनू कपूर यांच्यासोबत सीन शूट करतानाचा अनुभवही यावेळी सांगितला आहे. त्याविषयी ती म्हणाली, ‘राजा भद्रप्रताप आणि राणी उमंगलता यांच्या पहिल्या रात्रीचा तो लव्ह मेकिंग सीन होता. मी थोडी नर्व्हस होते. मात्र अनू कपूर यांनी मी अनकम्फर्टेबल होऊ नये याची काळजी घेतली. आपल्याला जर हा सीन करायचा आहे तर तो चांगला शूट झालाच पाहिजे’ असे मी ठरवले होते.
Edited By - Prashant Patil