बॉयकॉट ट्रेन्डला ब्रह्मास्त्रनं दिलं भिरकावून, रिलीज आधीच नावावर केला मोठा रेकॉर्ड

रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र'च्या वाटेवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. ९ सप्टेंबर,२०२२ रोजी सिनेमा रिलीज होत आहे.
Ranbir Kapoor-Alia Bhatt Brahmastra advance booking could be cross 30 crore nett at the boxoffice.
Ranbir Kapoor-Alia Bhatt Brahmastra advance booking could be cross 30 crore nett at the boxoffice.Google

Brahmastra: रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र'च्या वाटेवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. ९ सप्टेंबर,२०२२ रोजी 'ब्रह्मास्त्र' रिलीज होत आहे. याआधी सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगविषयी चांगल्या बातम्या कानावर पडत आहेत. दावा केला जात आहे की,आतापर्यंत सिनेमानं २४-२५ करोडच्या आसपास अॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले आहेत, तर हा आकदा ३० करोडपर्यंत पोहोचू शकतो. हा खरं तर पहिल्या आठवड्यात होणाऱ्या कमाईचा आकडा आहे. सिनेमाच्या ओपनिंग डे लाच ११ करोडची कमाई अॅडव्हान्स बुकिंगने केली आहे. जर हा आकडा पाहिला तर कोरोनानंतर अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तगडी कमाई करत 'ब्रह्मास्त्र' इतर हिंदी सिनेमांच्या पुढे निघून गेलाय.(Ranbir Kapoor-Alia Bhatt Brahmastra advance booking could be cross 30 crore nett at the boxoffice.)

Ranbir Kapoor-Alia Bhatt Brahmastra advance booking could be cross 30 crore nett at the boxoffice.
'त्यानंतर अबू सलेम शाहरुखला सारखे फोन करायचा, खंडणीसाठी नाही तर...' वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचे काही सिनेमे एकापाठोपाठ फ्लॉप होताना पाहून आधीच फिल्म मेकर्सचे धाबे दणाणले आहेत. त्यात आता बॉयकॉट ट्रेन्डमुळे अयान मुखर्जीची १० वर्षाची मेहनतही आता दाव्यावर लागली आहे. ब्रह्मास्त्र ५ भाषांमध्ये रिलीज होत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार कळत आहे की,ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी ११ करोड अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले आहेत. यामध्ये १० करोडची तिकीटं फक्त हिंदी व्हर्जनसाठी विकली गेलीयत. RRR ने हिंदी व्हर्जनसाठी पहिल्या दिवशी ७ करोडची कमाई केली होती. तसं पाहिलं तर मग 'ब्रह्मास्त्र' पहिल्या दिवशीच्या कमाईत RRR च्या पुढे निघून गेलाय. पण अजूनतरी केजीएफ चॅप्टर २ च्या हिंदी व्हर्जनच्या कमाईच्या तुलनेत ब्रह्मास्त्र बराच पाठी आहे. केजीएफची पहिल्या दिवसासाठी ४० करोडची तिकीटं विकली गेली होती.

Ranbir Kapoor-Alia Bhatt Brahmastra advance booking could be cross 30 crore nett at the boxoffice.
'महाराष्ट्रात अनेक गावांत अजूनही मुलींनी संबळ वाजवणं म्हणजे..',सानिया स्पष्टच बोलली

Sacnilk च्या रिपोर्ट्सनुसार 'ब्रह्मास्त्र'ने हिंदी व्हर्जनसाठी ओपनिंग वीकेंडला जवळपास २३ करोडची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. तेलुगु व्हर्जनसाठी ९८ लाखाची कमाई केली आहे. तर तामिळ व्हर्जनासाठी ११.१ लाख रुपयांची तिकीट विक्री केली आहे. अद्याप कन्नड आणि मल्याळम व्हर्जनसाठीची अॅडव्हान्स बुकिंग खूपच कमी असल्याचं समोर आलं आहे.

Ranbir Kapoor-Alia Bhatt Brahmastra advance booking could be cross 30 crore nett at the boxoffice.
Video: योगा व्हिडीओत असं काय दिसलं की करिना कपूर होतेय ट्रोल,लोक म्हणू लागलेयत..

या सगळ्या आकड्यांना पाहिलं तर ब्रह्मास्त्रची ओपनिंग आणखी जबरदस्त होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. बोललं जात आहे की 'सूर्यवंशी' सिनेमाच्या ओपनिंगच्या कमाईचा आकडा देखील 'ब्रह्मास्त्र' पार करेल. सिनेमाचं बजेट ४१० कोटीचं आहे असं बोललं जात आहे. चांगली गोष्ट ही आहे की,'ब्रह्मास्त्र'ची बॉक्सऑफिसवर कोणत्या इतर मोठ्या सिनेमाशी टक्कर होत नाहीय. आता हे पाहणं इंट्रेस्टिंग असेल की थिएटरकडे किती प्रेक्षकांचे पाय वळतायत,आणि सिनेमाचं बॉक्सऑफिसवर भविष्य किती उजळतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com