
Video: रणबीर - रणबीर ओरडत होती, त्यानंतर जे घडलं त्यानं ती लाजली!
Ranbir Kapoor Video: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया (Ranbir Kapoor) भट्टचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. मुंबईतील आर के स्टुडिओमध्ये ते (Alia Bhatt wedding) लग्न पार पडलं होतं.त्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. आता रणबीर आणि आलिया त्यांच्या वेगवेगळ्या (Bollywood News) प्रोजेक्टच्या निमित्तानं स्पॉट दिसून येत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहे. सध्या रणबीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यामध्ये रणबीरचा स्टेडियममधील लूक दिसतो आहे. त्याचवेळी त्याला त्याच्या एका चाहतीनं हाक मारत त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ती काही एका हाकेवर थांबली नाही. ती सतत रणबीर रणबीर असं ओरडतच होती. त्यानंतर जे घडलं ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
लग्न झाल्यानंतर देखील रणबीरचं फॅन फॉलोइंग वाढताना दिसत आहे. खासकरुन तरुणींमध्ये ती विशेष लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. रणबीर जेव्हा केव्हा त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जातो तेव्हा त्याला त्याठिकाणी चाहत्यांचा गराडा पड़लेला दिसून येतो. फिमेल फॅन्समध्ये तो विशेष प्रिय आहे. सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये रणबीरच्या एका फॅन्सनं तो जो पर्यत कुठलाही प्रतिसाद देत नाही तोपर्यत त्याला हाक मारत राहायची. असा प्रकार सुरु केला होता. ती रणबीरला आय लव यु, असं म्हणून हाक मारत होती. सुरुवातीला रणबीरनं त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर त्यानं तिच्याकडे जो कटाक्ष टाकला. तो सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा कौतुकाचा विषय ठरतो आहे. हा व्हिडिओ दुबईतील एका फुटबॉल क्लब इंटरनॅशनल स्पर्धेचा आहे.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
त्या स्पर्धेमध्ये रणबीरनं भाग घेतला होता. रणबीर मैदानात उतरण्याच्या तयारीत असून त्याच्या नावाचा जयघोष त्यावेळी सुरु होतो. आपल्या चाहत्याच्या प्रतिक्रियेला तितकाच उत्साही प्रतिसाद रणबीरनं दिला. त्यानं त्या चाहतीकडे पाहत हसून तिला धन्यवाद दिले आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये केवळ रणबीरच नाहीतर कार्तिक आर्यन आणि अभिषेक बच्चन देखील दिसत आहे.
हेही वाचा: Video Viral : सैफ अली खानचा लेक कोणाला करतोय डेट ?
Web Title: Ranbir Kapoor Fans I Love Your Reaction Video Viral On Social Media Dubai Football Match
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..