Badshah:रॅपर बादशहाच्या महागड्या कारची किंमत ऐकून व्हाल थक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rapper Bahsah Shared a photo of his new luxurious car on social media

रॅपर बादशहाच्या महागड्या कारची किंमत ऐकून व्हाल थक्क

रॅपर बादशहाचं नाव म्हणजे बॉलीवूडमधील धमाल करणाऱ्यांमधे गणले जाते.बादशहाची प्रचिती काही काळातच फार झालेली दिसते.त्याच्या रॅप्सने बॉलीवूडमधे धमाल मचवली आहे.या (Badshah)कलाकाराची सध्या त्याच्या नविन कारसाठी खूप चर्चा चाललेली दिसते.या कलाकाराने स्वत:लाच एक महागडी कार गिफ्ट केली आहे.त्याची सध्या सोशल मीडियावर फार चर्चा चाललेली दिसते.

बादशाहने ऑडी Q8 कार खरेदी केली आहे.या कारची किंमत जवळपास करोडोच्या घरात आहे.बादशहाला महागड्या कारमधे आणि खास स्टाईलमधे फिरणं फार आवडतं.त्याच्या हेअर स्टाईलपासून ते त्याच्या कपड्यांपर्यंत त्याचा यूनिकनेस कायम चर्चेत असतो.बादशहाने घेतलेल्या नव्या कारसह इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय.या पोस्टमधे त्याने एक खास कॅप्शनही टाकले."माझी नवी कार माझ्यासारखीच आहे.या कारसह माझा नविन प्रवास सुरू करण्यास मी उत्सुक आहे."असे त्याने या पोस्टला कॅप्शन दिले आहे.त्याच्या घेतलेल्या नव्या कारचा आनंद त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय.

बादशहाच्या या पोस्टला सोशल मीडियावर लाखो लाईक्स मिळाले आहेत.पोस्ट टाकताच नेटकऱ्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटला शुभच्छांचा वर्षाव झाला.तर काही चाहत्यांनी नवीन गाडी खरेदी केल्याबद्दल पार्टी पाहिजे अशा प्रकारच्या मजेशीर कमेंट्स देखील केल्या.भारतातील ऑडी कारचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बादशाहसोबतचा फोटो शेअर केला आहे. बादशाहने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत तब्बल १ कोटी २३ लाख रुपये इतकी आहे.

स्टाईलिश काळा पॅन्ट आणि स्टाईलिश जॅकेट मधे बादशहाने फोटो शेअर केलाय.त्याच्या युनिक लूकमुळे बादशहा कायम चर्चेत असतो.त्याच्या लूकचेसुद्धा सोशल मीडियावर अनेक फॅन्स आहेत.बादशहाजवळ ऑडीबरोबरच अनेक महागड्या कारचे कलेक्शन आहे.

Web Title: Rapper Badshah Shared His Luxurious Audi Car Photo On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top