Rashmika Mandanna Video: रश्मिकासोबत सेल्फी काढायला आला बाउन्सरनं त्याला मागचं फेकला! व्हिडिओ व्हायरल

Rashmika Mandanna
Rashmika Mandanna Esakal

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही नॅशनल क्रश म्हणुन ओळखली जाते. दाक्षिणात्या अभिनेत्री असली तरी तिने संपुर्ण तरुणाईला वेड लावलं आहे. तिनं पुष्पा या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारून जगभरातील चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

Rashmika Mandanna
Amitabh Bachchan Video: 'उन लई वाढलय म्हणुन तो त्याचा..', बिग बींनी शेअर केला 'त्या' व्यक्तीचा व्हिडिओ...

तिच्या गोंडस आणि गोड स्वभावामुळे ती केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही चाहत्यांची मनं जिंकते. सध्या रश्मिकाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चाहत्यांची मने जिंकत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका तिच्या बॉडीगार्डसोबत एका इव्हेंटमध्ये दिसत आहे.

आता रश्मिका आली म्हणजे तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी खुपच गर्दी केली. तिच्या चाहत्यांनी तिला चहूबाजूंनी घेरले होते. दरम्यान, रश्मिकाच्या बॉडीगार्डनं फोटो काढण्यासाठी आलेल्या एका माणसाला जोरात ढकलले.

त्याच हे वागणं नेटकऱ्यांना मुळीच पटलं नाही. हे पाहून खूद्द रश्मिकालाही त्याचा धक्का बसला. रश्मिकाने त्यावेळी तिच्या अंगरक्षकाला थाबवलं.

Rashmika Mandanna
The Kerala Story BO Collection: आता द्विशतक दूर नाही! द केरळ स्टोरीनं 12 दिवसात कमावले किती कोटी?

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. याच व्हिडिओत पुढे एक मुलगी मागून रश्मिकाला हाक मारते आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा असल्याचं सांगते.

त्या गोंडस मुलीला पाहून रश्मिकाही थांबते. ती त्या मुलीसोबत सेल्फी घेते. रश्मिकाचा गोड हावभाव पाहून चाहतेही खूप खूश झाले आहेत आणि अभिनेत्रीचे कौतुक करताना दिसत आहेत.

Rashmika Mandanna
The Kerala Story: 'केरळ स्टोरी पाहायला थिएटरमध्ये कुणीच नव्हतं....', तामिळनाडू सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

रश्मिका सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूरसोबत ती त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. संदीप रेड्डी वंगा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय रश्मिका अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा 2' या चित्रपटातही दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com