गुलशन कुमारांनी ठणकावून सांगितलं होतं, "तुला पैसे देण्यापेक्षा वैष्णवदेवीतल्या अन्नछत्रात पैसे देईन"

गुलशन कुमारांनी ठणकावून सांगितलं होतं, "तुला पैसे देण्यापेक्षा वैष्णवदेवीतल्या अन्नछत्रात पैसे देईन"

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली आणि बॉलिवूडमधील नेपोटीझमच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. याच चर्चांमध्ये ठिणगी पडलीये ती सोनू निगम याने म्युझिक इंडस्ट्रीवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे. सोनू निगमच्या पावलावर पाऊल टाकत गायक आणि संगीत दिग्दर्शक अदनान सामी याने देखील म्युझिक इंडस्ट्रीबद्दल काही गंभीर वक्तव्य केलीत. या सर्वांमध्ये बॉलिवूडची म्युझिक इंडस्ट्री आणि त्यातील नेपोटीझम किंवा एकाधिकारशाही वादाच्या केंद्रस्थानी आहे. त्यातही चर्चेत आहे एक म्युझिक कंपनी जिचं नाव आहे टी सिरीज... आजच्या या रिपोर्टमध्ये आपण 'टी सिरीज' संस्थापक कॅसेट किंग गुलशन कुमार यांच्यावर नजर टाकणार आहोत. या आर्टिकलमधील संदर्भ हे डोंगरी ते दुबई या पुस्तकातून घेतलेले आहेत.

गुलशन कुमार, एक अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्व. वैष्णोदेवी, साईबाबा, शनीदेव, शिव शंकर या देवांवर अपार श्रद्धा असणारं व्यक्तिमत्व. तर एकीकडे मुंबईत असणारं मुस्लिमधार्जिणे अंडरवर्ल्ड. गुलशन कुमार यांच्या हत्येने संपूर्ण बॉलिवूड हादरलं आणि खंडणीसाठी अंडरवर्ल्ड कुठवर जाऊ शकतं याची कल्पनाही सर्वांनाच आली.    

थोडं मागे जाऊयात. गुलशन कुमार यांची कॅसेट किंग म्हणून निर्माण झालेली ओळख एका रात्रीत झालेली नव्हती. वय वर्ष २३, गुलशन कुमार यांनी दिल्लीतील नॉयडामध्ये सुपर कॅसेट नावाची कंपनी सुरु केली आणि आपल्या समोर आलेत एकसे बढकर एक गायक ज्यामध्ये आज टी सिरीजवर आरोप करणारे सोनू निगम यांचाही समावेश आहे. त्यानंतर त्यांनी टी सिरीज ही म्युझिक कंपनी देखील काढली. गुलशन कुमार यांनी मेहनतीने आपली कंपनी उभी केली. त्यांनी काढलेले अल्बम्स आणि हिंदू धर्मीय धार्मिक गाण्यांमुळे त्यांचं मोठं नाव झालं. १९९२-९३ मध्ये तर गुलशन कुमार यांची देशात सर्वाधिक टॅक्स भरणारे उद्योजक म्हणून नोंद आहे. मात्र हीच बाब कुणाच्या तरी डोळ्यात खुपत होती.  

अंडरवर्ल्डला बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण करायचा होता. यासाठी कुख्यात गुंड अबू सालेम विविध पर्याय वापरात होता. सुभाष घई आणि राजन राय यांच्यावर हल्ले करण्यात आलेत. राजीव नायरवर देखील हल्ला झाला. यानंतर एका पत्रकाराने अबू सालेमला फोन करून माहिती घेण्याचा प्रयन्त केला. यामध्ये अबू सालेम याने मोठा खुलासा केला. सुभाष घई आणि राजन राम याना मारायचं नव्हतं त्यांना फक्त भीती दाखवायची होती असं सालेम म्हणाला आणि पुढील काही दिवसात मोठा धमाका होणार असल्याचंही सालेम म्हणाला होता. या धमकीनंतर बॉलिवूडमधील अनेकांना सेक्युरिटी देण्यात आली. मात्र यामध्ये गुलशन कुमार नव्हते. पण हा धमाका होता गुलशन कुमार यांच्या होणाऱ्या हत्येचा. 

एकीकडे कॅसेट किंग गुलशन कुमार यांना अबू सालेमचे धमकीचे फोन येत होते. वारंवार खंडणी मागितली जात होती. मात्र कुमार यांनी अबू सालेमला अजिबात भीक घातली नाही. त्यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रारीही केल्या होत्या. अशाच एका धमकीच्या फोनमध्ये गुलशन कुमार यांनी सालेमला कडक शब्दात "तुला खंडणी देण्यापेक्षा मी वैष्णोदेवी येथे अन्नछत्र चालवण्यासाठी पैसे देवू शकतो. पण तुम्हाला पैसे देणार नाही" असं सुनावलं होतं. 

पूढील काही दिवसात गुलशन कुमार यांचा बॉडीगार्ड आजारी असल्याची टीप सालेमला मिळाली आणि त्याने लगेच प्लॅन केला गुलशन कुमार यांना संपवण्याचा . गुलशन कुमार एकटे असताना त्यांचा गेम करा असं अबू सालेमने त्याच्या शार्प शूटर्सला सांगितलं होतं. सोबतच एक महत्त्वाचा संदेशही दिला होता. गुलशन कुमार यांचा मारताना तडफडताना आवाज ऐकायचा आहे असं त्याने आपल्या शूटर्सला सांगून त्यांच्यासोबत एक मोबाईल फोन देखील दिला होता . 

शेवटी उगवला १२ ऑगस्टचा काळा दिवस. गुलशन कुमार हे मुंबईतील अंधेरीमधील जीतेश्वर मंदिरातून जाऊन आले होते. बाहेर येताच त्यांच्यावर तुफान गोळीबार करण्यात आला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गुलशन कुमार यांनी जवळच असलेल्या मुतारीच्या आडोशाला जाण्याचा प्रयत केला. तिथेही मारेकरी आलेत. शेवटी ते एका झोपडीवजा घरात ते गेलेत. मात्र तिथेही मारेकरी आलेत. मारेकरी मोबाईलवरून सालेमला गोळ्यांचा आवाज आणि गुलशन कुमार यांचा आवाज ऐकवत होते आणि हे ऐकून अबू सालेम खुश देखील होत होता. 

हा भीषण प्रकार झाल्यानंतर पोलीस इन्व्हेस्टीगेशन सुरु झालं. यामध्ये पोलिसांना जावेद फावडाला पकडायचं होतं. मात्र चकमकीत पोलिसांकडून एक भाजी विक्रेता ठार झाला. यावरून मुंबई पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेत. पुढे शर्मा यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि यामधून मोठे खुलासे करण्यात आलेत. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नदीम सैफी याने गुलशन कुमार यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती. हा कट दुबईतील एम्पायर हॉटेलमध्ये रचण्यात आला होता आणि त्यावेळी इथे बॉलिवूडच्या बडे लोक इथे उपस्थित होते. यामध्ये शाहरूख खान, सलमान खान, जॅकी श्रॉफ यांची कसून चौकशी देखील झाली. 

bollywood nepotism gulshan kumar and underworld real story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com