आता तुझी वेळ ! निहारिका तिवारीला जीवे मारण्याची धमकी

निहारिका तिवारीने केली उदयपूरच्या घटनेची निंदा
Niharika Tiwari News
Niharika Tiwari Newsesakal

एमटीव्हीच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'रोडीज' ची माजी स्पर्धक निहारिका तिवारी सध्या बातम्यांमध्ये झळकत आहे. वास्तविक निहारिकाला कन्हैयालाल प्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तिने उदयपूरमध्ये झालेल्या घटनेची निंदा करत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर तिला सोशल मीडियावर (Social Media) धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. निहारिका तिवारी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्याची रहिवाशी असून सध्या इंडोनेशियात (Indonesia) आहे. जेव्हापासून निहारिकाने उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांचा गळा चिरुन हत्याकरणारा व्हिडिओ शेअर केला आहे. (Roadies Ex Contestant Niharika Tiwari In Trouble, Received Death Threats)

Niharika Tiwari News
Captain Miller : धनुषचा नवा चित्रपट, चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

त्यांना धमक्या देण्यास सुरुवात झाली आहे. काही लोक निहारिकाचे समर्थन करित आहे. काहींनी तिच्याविषयी अर्वाच्य भाषेत प्रतिक्रिया देत कन्हैयासारखी स्थिती होईल, अशी धमकी देत आहेत. एका यूजरने लिहिले, आता तू उलटी गणती सुरु कर, आता तुझी वेळ ! वृत्तांनुसार निहारिका म्हणते, की ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. मग ती तिथे खुलेपणाने मत व्यक्त करत असते. उदयपूरची घटना निंदनीय आहे, असे ती म्हणाली.

Niharika Tiwari News
ज्ञान कुठूनही मिळवा, मात्र त्याची खात्री करुन घ्या; बच्चन यांचा कानमंत्र

मी काही चुकीचे केलेले नसून मी नुपूर शर्माची बाजू घेतलेली नाही. मी फक्त कन्हैयालाल यांच्या हत्येला विरोध केला आहे, असे निहारिकाने सांगितले. नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या कन्हैयालालची उदयपूरमध्ये क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. दुसरीकडे निहारिका तिवारीने (Niharika Tiwari) आपल्या व्हिडिओत म्हणाली होती, की आपल्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. हे योग्य आहे का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com