RRR च्या पार्टीत आमिर असं काय बोलला की राजामौलींची माफीच मागावी लागली Aamir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan, Makarand Despande and SS Rajamouli at RRR bash

RRR च्या पार्टीत आमिर असं काय बोलला की राजामौलींची माफीच मागावी लागली

जगभरात बॉक्सऑफिसवर १००० करोड कमावल्यानंतर RRR च्या टीमनं सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली,अभिनेते रामचरण आणि ज्यु,एनटीआर हे तर होतेच पण त्याचसोबत बॉलीवूडमधल्याही काही दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात करण जोहर,जावेद अख्तर,अयान मुखर्जी,जितेंद्र आणि आमिर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी आमिरनं खास स्टेजवर जाऊन RRR च्या टीमचं कौतूक तर केलंच पण दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांना एक नवी पदवी बहाल केली. त्यानं त्याचं नवीन नामकरण केलं थोडक्यात. हे आमिरनं दिलेलं नवीन ना राजामौलींना आवडलं असलं तरी त्यांनी एका गोष्टीवरनं आमिरला बोलता-बोलता हटकलं. असं काय म्हणालाय आमिर खान?

हेही वाचा: मध्यरात्री अमिताभ बच्चन यांचा पारा चढला; थेट पोस्ट करुनच व्यक्त केला राग

आमिर म्हणाला,''मला खूप आनंद होतोय. खूप मेहनत घेतल्यावर,खूप अडचणींचा सामना केल्यावर अखेर यशाची गोड फळं चाखायला या टीमला मिळाली आहेत. मला आनंद होतोय की मी अगदी शेवटी का होईना पण सिनेमाच्या यशाच्या प्रवासात एक मित्र म्हणून सामिल होतोय. सिनेमानं एवढा चांगला प्रतिसाद मिळवला आहे त्यामुळे मला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहायचा आहे. पण 'लाल सिंग चड्ढा' च्या पोस्ट-प्रॉडक्शन मध्ये बिझी असल्याकारणानं अद्याप ते शक्य झालं नाही. लोकांमध्ये सिनेमाची चर्चा आहे. लोकं सिनेमाचं कौतूक करताना थांबत नाही आहेत. राजामौलींना हाक मारल्यानंतर ते ज्या पद्धतीनं उत्साहात बोलू लागतात तेव्हा सिनेमाच्या यशाचा आनंद त्यांच्या आवाजात मला जाणवला''.

हेही वाचा: आलिया-रणबीरचं हनीमून डेस्टिनेशन झालं लीक

RRR सिनेमाचे दिग्दर्शक राजामौलींविषयी बोलताना आमिर म्हणाला,''एकाच माणसात शिक्षक आणि विदयार्थी अशा दोन्ही क्वालिटी दडल्या आहेत. हे खूप कमी जणांमध्ये असतं. त्यांनी आपल्या कामावर नितांत प्रेम केलंय हे दिसतंय. आणि त्यामुळे हे यश त्यांचंच होतं,त्या यशावर त्यांचाच हक्क होता. आमिरनं राजामौलींना आमचं असंच मनोरंजन करत रहा असं म्हणत शुभेच्छा दिल्या''.

हेही वाचा: गर्मीने घसा सुकला सांगत चाहत्याची सोनूकडे बिअरची डिमांड;सूदभाईचं कडक उत्तर

राजामौलींनी देखील आमिर विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, ''आमच्यात एक करार झालाय. ज्यात आम्ही एकमेकांना 'सर' किंवा 'जी' असं काही म्हणणार नाही. राजामौलींना सुरुवातीला आमिरला हाक मारताना हे कठीण जात होतं. तेव्हा आमिरनेच त्यांना आपल्याला 'AK' म्हणून हाक मार असं सांगितलं. राजामौलींनी यावर RRR च्या सक्सेस पार्टीत आमिरनं त्यांच्या नावापुढे 'जी' लावल्यावर करार मोडलास असं जाहिरपणे सांगितलं. तेव्हा लगेच आमिरनं यासाठी माफी मागत फक्त 'राजा' म्हटलं. आणि लगेच पुढे म्हणाला,' राजा हिंदुस्थानी'.कारण तु आता संपुर्ण भारताचा फेव्हरेट झाला आहेस''.

हेही वाचा: हृतिकसमोरच पुर्वाश्रमीची पत्नी सुझैननं बॉयफ्रेंडसोबत ओलांडली मर्यादा...

या आमिरच्या कमेंटवर राजामौली मात्र लाजले आणि म्हणाले जेव्हा मास्टर्स असलेल्या कोणाकडून आपल्याला छान कमेंट मिळते तेव्हा मन आनंदून जातं. आमिरच्या 'लगान' सिनेमानं RRR आधी मोठा रेकॉर्ड केला आहे त्यामुळे राजामौली यांनी आमिरला मास्टर्स संबोधलं. यावेळी आमिरही लगानच्या आठवणीत रमला. राजामौली यांनी आमिरचे आभार मानले तेव्हा तो म्हणाला,,''आता आम्ही तुझे फॅन आहोत.आम्ही तुझ्यासाठी थोडं जरी काही करु शकलो तर त्यात आमचा आनंदच आहे. आता RRR पाहण्याची माझी उत्सुकता आणखीच वाढली आहे''.

Web Title: Rrr Succes Partyaamir Khan Speaks On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..