टायटॅनिकच्या हिरोची युक्रेनला 76 कोटींची मदत, कारण...

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये हॉलीवूडच्या लिओनार्दो दी कॅप्रियोच्या (Leonardo DiCaprio) नावाचा उल्लेख करावा लागेल.
Leonardo dicaprio
Leonardo dicaprioesakal

Hollywood News: आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये हॉलीवूडच्या लिओनार्दो दी कॅप्रियोच्या (Leonardo Dicaprio) नावाचा उल्लेख करावा लागेल. त्याला द रेव्हरेंटसाठी ऑस्कर मिळाला होता. केवळ अभिनेताच नाहीतर एक (Russia And ukrain war) समाजसेवक आणि ठाम भूमिका घेणारा अभिनेता म्हणून लिओच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. टायटॅनिक हा त्याचा पहिला चित्रपट त्यामध्ये केंट व्हिन्स्लेट ही त्याची सहकलाकार होती. या चित्रपटानं इतिहास घडवला होता. त्याला दहाहून अधिक ऑस्कर होते. (Russia Ukraine war) लिओनार्दो आता त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. त्यानं युक्रेनला मोठी मदत केली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्धानं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये कित्येक देशांना या युद्धाचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यात आशियायी देशांची संख्याही सर्वाधिक आहे. रशिया आणि युक्रेनच्या वादात अनेक देशांनी उडी घेतली आहे. मात्र रशिया काही ऐकायला तयार नसल्यानं वाद आणखी चिघळत चालला आहे. अशा परिस्थितीत जगातील कित्येक सेलिब्रेटीनी रशियाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आणि युक्रेनला पाठींबा दिला आहे. यापूर्वी काही अभिनेते आणि गायिका यांनी पुतीन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. लोकांना काय हवे आहे याचा विचार पुतीन करत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

Leonardo dicaprio
सरकारी नोकरीचा थाट; हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral

लिओनं आता युक्रेनसाठी 76 कोटी रुपये दिले आहेत. ते त्यानं मदत म्हणून पाठवले आहे. युक्रेननं त्याला धन्यवाद दिले आहेत. मात्र यामागे कारण म्हणजे लिओची दिवंगत आजी आहे. त्या युक्रेनमधील ओडेसाच्या होत्या. त्यांचे 2008 मध्ये निधन झाले. लिओ हा त्यांच्या जवळ होता. यामुळे त्याचे युक्रेन कनेक्शन स्पेशल आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद आणखी चिघळत चालला आहे. त्याचे गंभीर परिणाम दोन्ही शहरांवर झाला आहे.

Leonardo dicaprio
हर हर महादेव! मोदींनी वाराणसीत वाजवलं डमरू; VIDEO VIRAL

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com