Somi Ali : वयाच्या पाचव्या वर्षी शारीरिक शोषण, सलमानची मारहाण; सोमीचे खळबळजनक आरोप

Somi Ali shocking allegation on salman khan
Somi Ali shocking allegation on salman khan

Somi Ali on Salman Khan : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांची कमी नाही. सलमान खानची सर्वाधिक फॅन फॉलोइंग महिलांमध्ये आहे. सलमान खान त्याच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सलमान खानवर त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने गंभीर आरोप केले आहेत. 

सोमी अलीची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ती तिला तिचे जुने दिवस आठवत असल्याचे सांगत आहे. (Somi Ali shocking allegation on salman khan)

सोमी अलीने यापूर्वी देखील सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी तिने सलमानने तिचा छळ केल्याचे म्हटले आहे. यावेळी सोमीने तिच्या पोस्टची सुरुवात 'नो मोअर टीयर्स' या एनजीओने केली. सोमी अली म्हणाली, तिने मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी ही संस्था सुरु केली होती. पीडितांना वाचवण्यासाठी तिने 15 वर्षे काम केले. 

Somi Ali shocking allegation on salman khan
Conversion of religion : पिंपरी-आळंदीमध्ये धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न, येशूंचे रक्त म्हणून दिले...

सोमीने खुलासा केला की तिने नो मोअर टियर्स सुरू केले कारण ती स्वतः लहानपणी लैंगिक हिंसाचाराला बळी पडली होती. वयाच्या पाचव्या वर्षी आपले शारीरिक शोषण झाल्याचे तिने सांगितले. यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी पाकिस्तानात घरच्या मदतनीसाने तिचे शारीरिक शोषण केले. 

वयाच्या १४ व्या वर्षी अमेरिकेत तिच्यावर अत्याचार झाला. यानंतर ती भारतात आली तेव्हा एका व्यक्तीने तिच्यावर घरगुती हिंसाचारही केला, ज्याला ती आठ वर्षे डेट करत होती, असे सोमी अलीने म्हटले आहे. 

Somi Ali shocking allegation on salman khan
Urvashi Rautela Trolled: "बाई जगू दे त्याला", उर्वशीच्या रुग्णालयातील फोटोंमुळे नेटकऱ्यांनी झाडलं..

पुढच्या पोस्टमध्ये सोमी अलीने सलमान खानवर देखील गंभीर आरोप केले. सोमी म्हणाली, माझा भारतात येण्याचा खरा उद्देश सलमान खानशी लग्न करणे हा होता. मी त्यावेळी 16 वर्षांची निरागस मुलगी होते. त्यावेळी माझे मन पूर्णपणे बालिश होते. खऱ्या आयुष्यात त्याने माझ्यासाठी साकारलेली व्यक्तिरेखा इतकी वेगळी होती याची मला कल्पना नव्हती. सलमान खानने भारतात 'फाईट आणि फ्लाईट' डिस्कवरी मालिकेवर भारतात बंदी घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सलमानच्या वकिलांनी मला न्यूयॉर्कमध्ये धमकीचे मेल पाठवले.

Somi Ali shocking allegation on salman khan
Bigg Boss Marathi 4: फिनालेच्या पूर्वतयारी दरम्यान प्रसाद- अमृता झाले रोमँटिक..

मी मुंबईत असताना सलमान खान मला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. त्यावेळी माझे मेकअप आर्टिस्ट अजय शेलार यांना जखम लपविण्यासाठी माझ्या मानेवर आणि इतर अनेक ठिकाणी मेकअप करावा लागला होता. मी जेव्हा स्टुडिओत जायचे तेव्हा निर्माते हे सगळे बघायचे. हे मी सर्व स्टंटसाठी नाही सांगत आहे. सलमाने हे अनेक मुलींसोबत केले आहे, असा आरोप सोमी अलीने केला आहे.

Somi Ali shocking allegation on salman khan
Suniel Shetty: "बॉलिवूडला बॉयकॉट करणं थांबवा", सुनिल शेट्टीची सीएम योगींना विनंती..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com